आर्थिक लाभासाठी करण्यात येणारे लहान मुलांचे शोषण रोखण्यासाठी शांततेच्या मार्गाने करण्यात येणाऱ्या आंदोलनांसाठी कैलाश सत्यर्थी ओळखले जातात. भारतातील बालकामगार विरोधी चळवळीत १९९०पासून ते कार्यरत असून आतापर्यंत त्यांच्या संस्थेने ‘बचपन बचाओ’ आंदोलनाच्या माध्यमातून भारतातील ८०,००० बालकामगारांना विविध प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त केले आहे. या आंदोनाच्या माध्यमातून बालकामगारांच्या पुनर्वसन आणि शिक्षणासाठी प्रयत्न केले जातात. जागतिक पातळीवर देखील लहान मुलांशी संबंधित अनेक सामाजिक प्रश्नांवर सत्यर्थी यांनी आवाज उठवला आहे. ‘इंटरनॅशनल सेंटर ऑन चाईल्ड लेबर अॅण्ड एज्युकेशन’ या संस्थेच्या माध्यमातून कैलाश सत्यर्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. लहान मुलांसाठी वेळोवेळी झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय करारांमध्येही सत्यर्थी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आतापर्यंत त्यांच्या कामाची विविध माध्यमांतून दखल घेण्यात आली असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
कैलाश सत्यर्थी यांना आतापर्यंत देण्यात आलेल्या विविध पुरस्कारांची यादी:
२००९- डिफेंडर्स ऑफ डेमोक्रसी पुरस्कार (अमेरिका)
२००८- अल्फान्सो कमिन आंतरराष्ट्रीय पुरस्कार (स्पेन)
२००७- मेडल ऑफ द इटालियन सेनेट
२००७- हिरोज अॅक्टिंग टू एन्ड मॉर्डन डे स्लेव्हरी (अमेरिका)
२००६- फ्रिडम पुरस्कार (अमेरिका)
२००२- वॉलेनबर्ग मेडल (मिशिगन विद्यापीठ)
१९९९- फेंड्रिच एबर्ट स्टिफटंग पुरस्कार (जर्मनी)
१९९५- ‘रॉबर्ट एफ. केनेडी ह्युमन राईटस् पुरस्कार (अमेरिका)
१९८५- द ट्रम्पटर पुरस्कार (अमेरिका)
१९८४- अॅकनेर आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार. (जर्मनी)
BREAKING NEWS: The #nobelprize2014 in Peace is awarded to Indian Kailash Satyarthi and Pakistani Malala Yousafzay pic.twitter.com/W1K0rh9An6
आणखी वाचा— The Nobel Prize (@NobelPrize) October 10, 2014