Who is Muskan Rastogi: मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असलेल्या सौरभ राजपूत हत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली आहे. सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने निर्घृण खून केला. सौरभ आणि मुस्कानला सहा वर्षांची मुलगी आहे. सौरभ चांगल्या नोकरीला असून त्याची आर्थिक परिस्थितीही चांगली आहे. तरीही मुस्कानने व्यसनी साहिलसाठी स्वतःच्या पतीला संपवले. ४ मार्च रोजी सौरभचा खून केल्यानंतर मुस्कान आणि साहिल हिमाचल प्रदेशमध्ये थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेले.

हिमाचल प्रदेशहून परतल्यानंतर मुस्कानचे बिंग फुटले. प्रथम तिच्या आईला या हत्येची माहिती मिळाल्यानंतर रस्तोगी दाम्पत्यांनी पोलिसांत धाव घेत आपल्या मुलीच्या काळ्या कृत्याची माहिती दिली आणि त्यानंतर या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. मुस्कानने सौरभला जेवणातून औषध देऊन त्याला बेशूद्ध केले. त्यानंतर साहिलबरोबर मिळून त्याच्या शरीराचे १५ तुकडे केले. हे तुकडे प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून त्यावर काँक्रिड ओतले.

माणुसकीला आणि पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी मुस्कान रस्तोगी सध्या चर्चेत आहे.

कोण आहे मुस्कान रस्तोगी?

  • मुस्कान रस्तोगी २७ वर्षांची असून २०१६ साली तिने सौरभ राजपूतशी लग्न केले होते. या लग्नाला दोन्ही कुटुंबाचा विरोध होता. सौरभने मुस्कानसाठी त्याच्या कुटुंबियांना सोडले होते.
  • दोघेही मेरठमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.
  • मुस्कानने २०१९ साली एका मुलीला जन्म दिला.
  • मुलीला जन्म दिल्यानंतर मुस्कान आणि तिचा बालपणीचा मित्र साहिल शुक्ला पुन्हा एकदा भेटले आणि त्यांच्यात संबंध सुरू झाले.
  • मुस्कान आणि साहिल इयत्ता आठवीपर्यंत एकाच वर्गात होते.

अशी बनवली हत्येची योजना

सौरभ राजपूत फेब्रुवारी महिन्यात दोन वर्षांनंतर लंडनहून परतणार होता. मात्र या दोन वर्षांत मुस्कान आणि सौरभ एकमेकांमध्ये गुंतले होते. साहिलच्या मृत आईच्या नावाने स्नॅपचॅटवर अकाऊंट तयार करून मुस्कान त्याच्याशी आईच्या नावाने चॅट करत होती. मुस्कानने सौरभला मारायचे असल्याचे साहिलला त्याच्या आईच्या अकाऊंटवरून सांगितले. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून सौरभ राजपूतचा खून करण्याची योजना दोघेही आखत होते.

२४ फेब्रुवारी २०२५ रोजी सौरभ लंडनहून परतला होता. त्याआधीच मुस्कानने शरीराचे तुकडे करण्यासाठी दोन सुरे विकत घेतले होते. मांस कापण्यासाठी चांगले सुरा हवा आहे, असे सांगून हे सुरे विकत घेतले. तसेच आपल्याला नैराश्य आले असून झोपेचे औषध हवे आहे, असे एका डॉक्टरला सांगून त्याच्याकडून झोपेचे औषध लिहून घेतले. सौरभला हे औषध देऊन नंतर त्याचा खून करण्यात आला, अशी माहिती मेरठ शहराचे पोलीस अधीक्षक विक्रम सिंह यांनी दिली.

मुस्काननेच पती सौरभचा खून करण्यासाठी साहिलला तयार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच पती सौरभ लंडनमध्ये मर्चंट नेव्हीमध्ये नाही तर बेकरीमध्ये काम करतो, असाही दावा मुस्कानने केला होता.

दरम्यान सौरभ राजपूत मुलीच्या वाढदिवसानिमित्त लंडनहून परतला होता. मुलीच्या वाढदिवसानिमित्त मुस्कान, मुलगी आणि सौरभने पार्टी केली होती. या पार्टीत तिघेही छान नाचताना दिसत आहेत. मुस्कानही गाण्यावर थिरकताना दिसत आहे. पण काहीच दिवसांत सौरभचा असा दुर्दैवी अंत होईल, याची त्याला कल्पना नव्हती.

दरम्यान या प्रकरणावरून मेरठमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काल मुस्कान आणि साहिल शुक्लाला न्यायालयात हजर केले असता वकील आणि सामान्य लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलीस बंदोबस्त असतानाही लोकांनी साहिलला जोरदार चोप दिला. या हत्येमुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader