अमेरिकेत खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येचा कथित कट रचल्याच्या आरोप प्रकरणी अमेरिकेने निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. न्यूयॉर्कमधले अमेरिकेचे वकील डेमियन विल्यम्स यांनी एक निवेदन दिलं आणि मह्टलं आहे की निखील गुप्ताने न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाची हत्येचा कट रचला. या निवेदना पन्नूचं नाव लिहिलेलं नाही.
निखिल गुप्ताचं नाव समोर आल्याने आणि अमेरिकेने कायदेशीर कारवाई सुरु केल्याने पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये राजकीय तणाव निर्माण होण्याची चिन्हं आहेत. अमेरिकेतल्या न्याय विभागाने एक परिपत्रक जारी केलं होतं त्यामध्ये एक अज्ञात भारतीय सरकारी अधिकारी असा उल्लेख होता. निखिल गुप्ता अमली पदार्थ आणि हत्यारांची आंतरराष्ट्रीय तस्करी करत होता असंही म्हटलं आहे.
कोण आहे निखिल गुप्ता?
अमेरिकेच्या न्याय विभागाने छापलेल्या पत्रकाप्रमाणे निखिल गुप्ता हा ५२ वर्षीय भारतीय नागरिक आहे. एका आरोपात याच वर्षी निखिल गुप्ताला ३० जून रोजी अटक करण्यात आली. निखिल गुप्ताने एका कथित भारतीय सरकारी कर्मचाऱ्याची चर्चा केली होती. त्या भारतीय अधिकाऱ्याची नोंद कुठेच नाही त्याला CC-1 म्हणून संबोधलं जातं. निखिल गुप्ताने अमेरिकेत एका वकिलाची आणि राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्याची हत्या करण्याचा कट रचला होता असंही या पत्रकात म्हटलं आहे. निखिल गुप्ताने त्यासाठी CC1 शी चर्चा केली होती.
जूनमध्ये निखिल गुप्ताला हे कुणाची हत्या करायची आहे हे CC1 कडून सांगितलं गेलं. ही माहिती त्याने कथित हिटमॅनकडे पोहचवली होती. अमेरिकेच्या दस्तावेजात हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचाही उल्लेख आहे. निखिल गुप्ताने कथित हिटमॅनला निज्जर कुठे गेला आहे ते सांगितलं होतं.
समोर आलेल्या माहितीनुसार CC-1 ने निखिल गुप्ताला त्याचं टार्गेट कोण आहे हे ठाऊक होतं. न्यूयॉर्क शहरातील घराचा पत्ता, रोजचा वावर कुठे असतो, फोन नंबर काय आहे या गोष्टीही होत्या. तसंच हत्या करण्यासाठी १ लाख डॉलर्सपैकी १५ हजार डॉलर्सही देण्यात आले होते.