BJP MP Phangnon Konyak Accused Rahul Gandhi : भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार फान्गनॉन कोन्याक (Phangnon Konyak) यांनी गुरूवारी लोकसभेतील विरोधी पक्षनतेते राहुल गांधी यांच्यावर संसदेतील आंदोलनादरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा खासदार कोन्याक यांनी आपण एसटी समुदायातील आणि एक महिला सदस्य असल्याचा उल्लेख करत राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात कोन्याक यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामुळे त्यांचा प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान दुखावला गेला असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी या पत्रात अध्यक्षांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

आपण शांततेत आंदोलन करत होतो, त्यावेळी त्यांच्यासाठी वेगळा मार्ग असताना राहुल गांधी इतर काँग्रेस खासदाराबरोबर अचानक आपल्या समोर आल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

त्यानी माझ्याशी मोठ्या आवाजात ओरडून त्यांनी गैरवर्तन केले आणि ते माझ्या इतक्या जवळ आले की एक महिला सदस्य म्हणून मला खूप अस्वस्थ वाटले. मी जड अंतःकरणाने माझे संसदीय हक्क बाजूला ठेवून मागे हटले परंतु मला वाटले की कोणत्याही खासदाराने असे वागू नये”, असेही पत्रात म्हटले आहे.

नागालँड भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा कोन्याक यांनी एप्रिल २०२२ मध्ये पहिल्या राज्यसभेच्या खासदार बनून इतिहास घडवला होता. संसदेच्या दोन्हीपैकी कोणत्याही एका सभागृहात निवडून येणार्‍या त्या नागालँडमधील फक्त दुसर्‍या महिला आहेत.

गेल्या वर्षी १७ जुलै रोजी, कोन्याक या राज्यसभेच्या पहिल्या अशा महिला सदस्य बनल्या ज्यांना राष्ट्रवादीच्या फौजिया खान, नामनिर्देशित खासदार पीटी उषा आणि बीजेडीच्या सुलता देव यांच्यासह सह उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये नियुक्त केले गेले. याच्या आठवडाभरानंतरच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्यांच्या राज्यातील त्या पहिल्या महिला बनल्या. राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर लगेचच त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिलांना राजकारण आणि नेतृत्वात योग्य सन्मान आणि स्थान दिले जात असल्याबद्द आभार व्यक्त केले होते.

हेही वाचा>> Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं नॉनव्हेज खाणाऱ्यांना घरे नाकारणाऱ्यांबद्दल मोठं वक्तव्य; सरकारची भूमिका मांडताना म्हणाले…

कोन्याक या मुळच्या दिमापूर येथील आहेत. तसेच त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. तसेच यापूर्वी त्यांनी परिवहन, पर्यटन, सांस्कृतिक समिती आणि पुर्वोत्तर प्रदेश क्षेत्र विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीमध्ये सदस्या म्हणून काम केले आहे.

नॉर्थ इस्टर्न इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञान संस्था, शिलाँग येथील महिला सक्षमीकरण आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या समितीमध्ये देखील त्यांचा समावेश होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is phangnon konyak bjp rajya sabha mp from nagaland accused rahul of hurting her dignity marathi news rak