Sanjay Malhotra News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नपपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपतो आहे. त्यामुळे ११ डिसेंबर पासून पुढील तीन वर्षांसाठी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोण आहेत संजय मल्होत्रा?
संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) हे महसूल सचिव या पदावर कार्यरत आहेत.
संजय मल्होत्रा यांची आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ते हे पद सांभाळतील.
संजय मल्होत्रा ( Sanjay Malhotra ) हे १९९० बॅचचे राजस्थान केडरचे IAS (भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी) आहेत.
संजय मल्होत्रांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली आहे.
मल्होत्रा यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, यूएसए येथून पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
संजय मल्होत्रा ( Sanjay Malhotra ) हे १९९० च्या बॅचचे आणि राजस्थान केडरचे सनदी अधिकारी आहेत.
संजय मल्होत्रा ( Sanjay Malhotra ) यांनी कानपूरमधून कॉम्प्युटर विज्ञान या विषयात अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
संजय मल्होत्रा यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव (महसूल) आहेत. त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते.
संजय मल्होत्रा ( Sanjay Malhotra ) यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
संजय मल्होत्रा यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे
संजय मल्होत्रा ( Sanjay Malhotra ) हे १९९० च्या राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये ते आरईसीचे चेअरमन आणि एमडी या पदावर नियुक्त झाले. त्याआधी ते उर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत होते. २०२२ मध्ये डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसचे सचिव या पदावर ते कार्यरत होते. संजय मल्होत्रा यांना केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या संचालक पदीही नियुक्त केलं होतं. आता त्यांना आरबीआयचे गव्हर्नर हे पद देण्यात आलं आहे. पुढील तीन वर्षांसाठी त्यांचा कार्यकाळ असणार आहे.