Iran Vs Israel : इराणने १ ऑक्टोबरला इस्रायलवर २०० मिसाईल्स डागली आहेत. इस्रायल आणि हेझबोलाह यांचा संघर्ष त्याची व्याप्ती वाढतच चालली आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेने थेट इस्रायलची बाजू घेतली आहे. आता शक्यता अशी वर्तवण्यात येत आहे की येत्या काही काळात या ठिकाणची परिस्थिती आणखी चिघळू शकते.

वर्षभरात ४० हजार मृत्यू

Iran Vs Israel इस्रायल आणि हमास यांच्यात जे युद्ध सुरु आहे त्यामुळे गाझा पट्टी आणि वेस्ट बँक भागात आत्तापर्यंत ४० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून इस्रायलने हेजबोलाहला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायल लेबनॉनमध्ये जमिनीवरुन हल्ला करतो आहे. या संघर्षात काही देश इस्रायलच्या बाजूने तर काही देश इराणच्या बाजूने आहेत.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Syria loksatta news
अग्रलेख : वाळवंटातले वालीहीन!
Narendra Modi Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा; भारताची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “देशाची अखंडता जपण्यासाठी…”
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल

इस्माइल हनियाची हत्या आणि

Iran Vs Israel दोन महिन्यांपूर्वी हमासचा नेता इस्माइल हनिया याची इराने राजधानी तेहरानमध्ये हत्या केली. हनिया १९८० पासून हमासचं नेतृत्त्व करत होते. २९ सप्टेंबरला इस्रायलच्या हल्ल्यात हेजबोल्लाहचे नेते हसन नसरल्लाहचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मध्य पूर्व भागात संघर्ष टीपेला पोहचला आहे. इस्रायल ( Iran Vs Israel ) हेजबोल्लाहच्या ठिकाणांवर हल्ला करतो आहे. लेबनॉनमध्येही हल्ले सुरुच आहेत. हनिया यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणने काही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र १ ऑक्टोबरला मिसाइल हल्ला करुन संघर्षाची तीव्रता वाढवण्यात आली आहे.

हे पण वाचा- “बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका

इस्लामिक देशांची एकजूट

इस्रायलच्या ( Iran Vs Israel ) विरोधात इस्लामिक देशांची एकजुट करण्यासाठी इराणने आधीच या देशांना इस्रायशी व्यापार करु नका असं आवाहन केलं होतं. दुसरीकडे अमेरिका, ब्रिटन, जर्मनी हे देश इस्रायलच्या पाठिशी आहेत. या युद्धात ते इस्रायलची मदत करत आहेत.

अरब देशातील सुन्नी बहुल मुस्लिम देशांनी हेजबोल्लाहच्या नसरल्लाह यांच्या हत्येची थेट निंदा केलेली नसली तरीही अनेकांना ही बाब मुळीच पटलेली नाही. चार महिन्यांपूर्वी रफाहच्या शरणार्थी कँपवर इस्रायलने प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर सौदी अरबने म्हटलं होतं की इस्रायलला पॅलेस्टाइनचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे असं म्हटलं होतं. सौदी अरेबियाने केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं गेलं. सुन्नी नेतृत्वाचे सौदी अरेबियाचे नेते हसन नसरल्लाह मारले गेल्यानंनंतर लेबनॉनमध्ये संघर्ष उसळला आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाइन संघर्षावर कुणाला कुणाची साथ?

कतारने मध्य-पूर्व मध्ये होणाऱ्या संघर्षानंतर ( Iran Vs Israel ) सर्वपक्षीय चर्चा आणि संघर्ष थांबवण्यासाठी अनुकूल असल्याची भूमिका घेतली आहे. नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर इजिप्तचे राष्ट्रपती फतेह अल सीसीने लेबनॉनचे पंतप्रधान नाजिब मिकती यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. तुर्कस्तान आणि इस्रायल यांच्यात १९४९ पासून राजकीय संबंध आहेत. इस्रायलला मान्यता देणारा पहिला देश तुर्कस्तानच होता.

भारत कुणाबरोबर?

इस्रायल आणि इराण यांच्या संघर्षात भारताने दोन्ही देशांसाठी अॅडव्हायजरी लागू केली आहे. भारताने शांतता प्रस्थापित व्हावी अशी भूमिका घेतली आहे. भारताने १९८८ मध्ये पॅलेस्टाइनला राष्ट्राची मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांमधला एक देश होता. सध्याच्या घडीला भारताने कुठल्याही एका देशाची बाजू उचलून धरलेली नाही असंच दिसून येतं आहे.

Story img Loader