गुरूवारी माफिया अतीक अहमदचा मुलगा असद अहमद उत्तर प्रदेशातल्या एस टी एफ एनकाऊंटर केला. त्यानंतर गँगस्टर अतीक अहमदची चर्चा पुन्हा एकदा होते आहे. राजू पाल हत्याकांड प्रकरणाचे साक्षीदार उमेश पालच्या हत्या प्रकरणात मुख्य न्यायालयीन मॅजिस्ट्रेट यांच्या समोर गुरूवारी सुनावणी पार पडली. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांना कोर्टात आणलं होतं. कोर्टात या दोघांना आणलं जात असताना दुसऱ्या मजल्यावरून एक बुरखाधारी महिला सातत्याने या दोघांकडे बघत होती. या महिलेवरून आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
२८ मार्चला प्रयागराजच्या एमपी एमएमलए कोर्टात वकिलांसोबत काळा कोट घालून बसलेल्या काही लोकांची चर्चा झाली होती. काळ्या रंगाचे कोट घालून वकिलांमध्ये बसलेले हे लोक सुनावणीच्या दरम्यान मेसेजेस करून प्रत्येक क्षणाची अपडेट देत होते. तुम्ही नेमके कोण आहात? हे विचारलं गेल्यानंतर हे सगळे उठून निघून गेले होते. त्यानंतर शिक्षा सुनावली गेल्यानंतर हे सगळे लोक आरोपींच्या मागे गेले होते. काळे कपडे आणि अनोळखी व्यक्ती याची चर्चा आता पुन्हा एकदा होते आहे.
माफिया अतीक अहमदचा मुलगा असद अहमदचा उत्तर प्रदेश STF ने एकनाऊंटर केला. गुरूवारी झालेल्या या घटनेनंतर डॉ. अखलाख यांच्या घरी शोकाचं वातावरण आहे. कारण अखलाख यांच्या मुलीचा आणि असदचा निकाह होणार होता. अखलाख मेरठमध्ये राहतो. अखलाख अतीक अहमदचा मेहुणा आहे. डॉक्टर अखलाखला पोलिसांनी अटक केली आहे. अखलाखची पत्नी आयशा नूरीवरही हत्येचा आरोप आहे. आयशा नूरी फरार आहे असंही कळतं आहे.
असदचा एनकाऊंटर केल्यानंतर स्पेशल डी.जी. प्रशांत कुमार यांनी सांगितलं की अतीक अहमद आणि आणखी एक अपराधी या दोघांना साबरमीतहून बरेली तुरुंगात आणलं जात होतं. त्यावेळी कॉनव्हॉयवर हल्ला होईल अशी शक्यता होती. अशात पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई केली होती. आता मात्र कोर्टात आलेली ती बुरखाधारी महिला कोण? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.