- यासिन भटकळ ऊर्फ मोहमद अहमद सिद्धीबापा असे त्याचे पूर्ण नाव
- यासिन सध्या ३० वर्षांचा आहे. त्याच जन्म १५ जानेवारी १९८३ रोजी झाला
- उत्तर कर्नाटकमधील भटकळ हे त्याचे मूळ गाव
- दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने भटकळमधूनच घेतले
- यासिन नोकरीच्या निमित्ताने दुबईला जाऊन आला आहे
- यासिन भटकळविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती
- यासिन हा सुरुवातीला सिमीचा सदस्य होता
- सन २००३ मध्ये यासिनने इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेची स्थापना केली
- यासिन हा शाहरुख आणि इम्रान या नावानेही परिचित
- यासिनने पाकिस्तानमधून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले
- कोणत्याही ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यापूर्वी यासिन स्वतः तिथे जात असे
- बॉम्ब तयार करणाऱयांना आणि ते घटनास्थळी ठेवणाऱयांना यासिन स्वतः मार्गदर्शन करायचा
- इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेमध्ये तंत्रज्ञानाची माहिती असणारा यासिन हा एकमेव सदस्य
- देशातील सुरक्षायंत्रणांसाठी यासिन मोस्ट वॉटेंड दहशतवादी होता
संग्रहित लेख, दिनांक 29th Aug 2013 रोजी प्रकाशित
कोण आहे यासिन भटकळ?
यासिन भटकळ ऊर्फ मोहमद अहमद सिद्धीबापा असे त्याचे पूर्ण नाव
First published on: 29-08-2013 at 12:05 IST
TOPICSयासिन भटकळ
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is yasin bhatkal