आरुषी तलवार आणि नोकर हेमराज यांच्या हत्येच्या साडे पाचवर्षांनंतर एका विशेष सीबीआय न्यायालयात उद्या (सोमवारी) यावर निर्णय घेण्यात येणार आहे. या हत्याप्रकरणात आरुषीचे आई-वडिल दोषी आहेत का, ते या निर्णयानंतर कळणार आहे.
विशेष न्यायाधीश एस् लाल दंत हे दंत चिकित्सक दांम्पत्य राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांच्याविरुद्धच्या पंधरा महिन्यांच्या लांबलचक सुनावणीनंतर आपला निर्णय ऐकवणार आहेत. सध्या तलवार दांम्पत्य हे जामीनावर बाहेर आहेत. या दोघांवर १६ मे २००८ला त्यांच्या जयवायू विहार येथील घरात १४ वर्षीय मुलगी आणि नोकराची हत्या करून त्याचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.
उत्तर प्रदेश पोलीस आणि सीबीआयच्या वेगवेगळ्या तर्कांमुळे या प्रकरणात अनेक चढ उतार आले आहेत. सुरुवातीला शंकेची सुई राजेश तलवारवर होती. त्यानंतर त्यांचे मित्र, सहायक आणि अखेर या दांम्पत्यानेच ह्त्या केल्याची शंका आहे.