Maoist Chalapati killed in Encounter : अनेक राज्यातील सुरक्षा यंत्रणांना अनेक दशके हुलकावणी देणारा प्रताप रेड्डी रामचंद्र रेड्डी उर्फ चलपती (६२) हा सुरक्षा यंत्रणाबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. ओडिशाच्या सीमेजवळ छत्तीसगढच्या गरिआबंद जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पात ही चकमक झाली, ज्यामध्ये चलपती याला ठार करण्यात आले आहे. माओवाद्यांच्या रँकमध्ये अत्यंत झपाट्याने वर चढलेल्या चलपती याने अनेक हाय-प्रोफाइल हल्ले घडवून आणले होते, ज्यात एक आमदाराच्या हत्येचे प्रकरणाचा देखील समावेश आहे. इंडियन एक्सप्रेसने एका सुरक्षा अधिकार्याच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
रेड्डी हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील मातेमपैपल्ली (Matempaipally) गावातील असून २३ सप्टेंबर २०१८ रोजी अराकूच्या डंब्रिगुडा भागात झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाईंड असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा दावा आहे. या हल्ल्यात अराकू व्हॅलीतील टीडीपीचे आमदार किदारी सर्वेश्वर राव (Kidari Sarveswara Rao) आणि माजी टीडीपी आमदार सिवेरी सोमा (Siveri Soma) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या दोन टीडीपी नेत्याची हत्या करणाऱ्या माओवाद्यांच्या गटाचे नेतृत्व हे रेड्डी याची पन्ही पत्नी अरुणा हिने केल्याचा आरोप आहे.
१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा रेड्डी लहान होता तेव्हा तो सीपीआय (मार्क्सवादी लेनिनवादी)च्या पीपल्स वॉर ग्रुप(PWG) च्या विचारधारेकडे ओढला गेला. पुढे त्याने इंटरमिडीयट नंतर शिक्षण सोडले आणि तो श्रीकाकुलम येथे गेला आणि पीडब्लूजीमध्ये सहभागी झाला.
माओवाद्यांची माहिती गोळा करणाऱ्या स्पेशल इंटेलिजन्स ब्युरोने (SIB) तयार केलेल्या डॉजियरमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, त्याने श्रीकाकुलमच्या उद्दानम भागात काम केले आणि त्याला पक्षाच्या सदस्यावरून विभागीय समिती सदस्य (डीसीएम) बनवण्यात आले होते. रेड्डी याला प्रताप, रवी आणि जयराम अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असे.
अनेक नावांनी ओळखला जात असे
स्पेशल इंटेलिजन्स ब्यूरो (SBI) ने तयार केलेल्या माओवाद्यांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेल्या डॉजियरमध्ये सांगण्यात आलं आहे की, तो श्रीकाकुलमच्या उड्डानम भागात काम करत होता आणि पक्ष सदस्यपदाहून त्याची बढती डिव्हीजनल कमिटी मेंबर (DCM) अशी करण्यात आली होती. रेड्डी वेगवेगळ्या नावाने ओळखला जात असे, ज्यामध्ये प्रताप, रवी आणि जयराम अशा नावांचा समावेश आहे.
डिसेंबर २००० मध्ये त्याला स्पेशल झोनल कमिटी मेंबर बनवण्यात आले आणि त्याच्याकडे स्टेट मिलीटरी कमिशन ऑफ आंध्र ओडिशा बॉर्डर स्पेशल झोनल कमिटीची जबाबदारी देण्यात आली. त्याचे गनीमी पद्धतीचे युद्ध आणि रणनीती आखण्याचे ज्ञान, यामुळेच त्याची पदोन्नती इतक्या लवकर झाली असे सांगितले जाते.
सीपीआय (माओवादी) चे सेंट्रल मिलीटरी कमिशन देखील हाय प्रोफाईल हल्ल्यांसाठी तसेच नवीन माओवाद्यांच्या भरतीसाठी रेड्डीवर अवलंबून होते. तीन दशकांहून अधिक काळ आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात हल्ल्यांची योजना आखून त्यांचे नेतृत्व केल्याचा आरोप त्याच्यावर होता.
२०१६ मध्ये फोटो सापडला
मे २०१६ मध्ये अनेक दशके भूमिगत राहिल्यानंतर अखेर विशाखापट्टणममध्ये चकमकीत ठार झालेल्या एका माओवादी नेत्याच्या लॅपटॉपवर रेड्डीचा त्याच्या पत्नीबरोबरचा एक सेल्फी सापडला. त्यानंतरच तो नेमका कसा दिसतो हे आंध्र प्रदेश पोलिसांना माहिती झालं.
डेप्युटी कमांडर अरूणा उर्फ चैतन्य व्यंकट रवी हिच्याबरोबर प्रेम संबंधांमुळे २०१० मध्ये रेड्डी याला एक वर्षासाठी निलंबीत देखील करण्यात आले होते. पुढे या दोघांनी लग्न केले. तसेच २०१२ मध्ये तांत्रिक चुकीमुळे एका सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याने त्याची पदावनत देखील करण्यात आले होते.
सध्या रेड्डी हा ओडिशा राज्य समितीचा सचिव होता आणि त्यांच्या डोक्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला गुडघेदुखी त्रास होता आणि त्याने आंध्र-ओडिशा सीमेवर अनेक ठिकाणी गुपचूप उपचार घेतले होते.