नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संयुक्त जनता दलाच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक होणार असल्याची माहिती जेडीयूचे पक्षाध्यक्ष शरद यादव यांनी दिली.
या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. शरद यादव यांनी धर्मनिरपेक्ष शक्तींना बळकट करण्यासाठी लालूंसोबत आघाडी करण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, नितीशकुमार यांचा राजीनामा हे एक राजकीय नाटक असून, जेडीयू पक्षातील अंतर्गत बंडाळीचा हा परिणाम आहे, अशी खोचक प्रतिक्रिया लोकशक्ती जनता पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी दिली आहे.

Story img Loader