बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार विकास ते राजकीय ध्रुवीकरण आणि व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप अशा वळणांवर बदलत गेला. २०१४ मध्ये केंद्रातील सत्ता विकासाच्या मुद्दय़ावर मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारला विशेष पॅकेज जाहीर केले. याच वेळी नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यांच्याशी हातमिळवणी करून राज्याची सत्ता मिळविल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच मतदारांच्या दारी जाऊन मतांचा जोगवा मागितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीने विकासाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढविण्यावर भर दिला. या वेळी राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरण करण्यावर फारसा भर नव्हता. जातींची गणिते सुरुवातीपासूनच होती. त्यामुळे हा मुद्दा केंद्रस्थानी होता.

तिसऱ्या टप्प्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलेला आरक्षणाचा मुद्दा भोवल्याचे मानले जात आहे. केंद्राने आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार करावा, असे विधान करून भाजपवर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे. तर सीमांचलमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपचा पराभव झाला तर पाकिस्तानात फटाके फोडले जातील, असे विधान केले होते.

याचवेळी उत्तर प्रदेशातील दादरी येथील गोमांस घटनेनंतर तिसरा टप्प्यात राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. भाजपने विशेष करून या प्रचारावर भर दिला. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. गोमांस आणि असहिष्णुतेचा मुद्दाही अग्रभागी राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालूप्रसाद यांना सैतान म्हणून संबोधले. यावर लालू यांनी सैतान म्हणणारे स्वत: महासैतान असल्याचा प्रत्यारोप केला.

निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात भाजपने गोमातेचा मुद्दा प्रचाराचा केंद्रबिंदू बनवला. यावरून भाजपला निवडणूक आयोगाने कानपिचक्या दिल्या होत्या.