गेल्या वर्षी दिल्लीतील ‘निर्भया’बलात्कार व खून प्रकरणी तावातावाने बोलणारे काही नेते तरुण तेजपाल यांनी सहकारी पत्रकार महिलेवर केलेल्या लैंगिक गैरवर्तन प्रकरणी अतिशय ठळकपणे जाणवेल, अशा पद्धतीने मौन का बाळगत आहेत असा सवाल भाजपने केला आहे.
अरुण जेटली यांनी त्यांच्या फेसबुक पानावर लिहिले आहे, की तेजपाल यांनी सदर पत्रकार महिलेशी जे लैंगिक गैरवर्तन केले, ते निर्भया बलात्कार व खून प्रकरणाइतकेच गंभीर असून काँग्रेसचे काही नेते त्यावर गप्प आहेत. भाजपने असा आरोप केला, की तेजपाल हे काँग्रेसच्या जवळचे असून त्यामुळे सत्ताधारी पक्ष त्यांच्यावर टीका करीत नाही. काहींनी मौन धारण केले आहे, त्याची कारणे आम्हाला समजू शकतील काय, असा सवालही त्यांनी केला.

Story img Loader