भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पाटणा स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर आता काँग्रेसने मग मोदींनी मुझफ्फरनगरमधील दंगलग्रस्तांची का भेट घेतली नाही असा सवाल उपस्थित केला आहे.
‘बॉम्बस्फोटातील मृत हे हुतात्माच’
काँग्रेस नेते रशीद अल्वी म्हणाले, “मोदींची पाटणा येथील भेट संपूर्णपणे राजकीय हेतूतून प्ररीत होती. पाटणा स्फोटातील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या प्रती मोदींना खरी सहानुभुती आहे का? मग, मोदींनी मुझफ्फरनगरच्या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची का भेट घेतली नाही. यामागे केवळ राजकारण आहे. बाकी काही नाही. असे राजकारण करणे दुर्देवी आहे.”
मोदींची भाजपच्या खासदारांशी गुप्त भेट?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा