Mark Zuckerberg On Pakistan: फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप यांची पालक कंपनी असलेल्या मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्गला पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. याबद्दलचा खुलासा स्वतः मार्क झुकरबर्गने एका मुलाखतीदरम्यान केला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ईशनिंदा झाल्याचा ठपका ठेवत मार्क झुकरबर्गला जबाबदार धरण्यात आले होते. मोहम्मद पैगंबर यांच्याबाबतीत कोणतीही चुकीची कृती पाकिस्तानमध्ये खपवून घेतली जात नाही. ईशनिंदेबाबत त्यांच्याकडे कडक कायदे आहेत. फेसबुकवर अपलोड झालेल्या एका चित्रावरून फेसबुकविरोधात खटला चालविण्यात आला होता. याची माहिती मार्क झुकरबर्गने जो रोगनच्या पॉडकास्टमध्ये दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकरण काय आहे?

फेसबुकवर अपलोड केलेल्या एका पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. ईशनिंदेबाबत कडक कायदे असल्यामुळे याविरोधात खटला दाखल करण्यात आला. झुकरबर्गने सांगितले की, फेसबुकवर मोहम्मद पैगंबर यांचे एक चित्र शेअर करण्यात आले होते. पाकिस्तानच्या कायद्यानुसार याला ईशनिंदा मानले गेले. या पोस्टनंतर माझ्याविरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात आला. तसेच सुनावणी नंतर फाशीची शिक्षा सुनावली गेली.

मार्क झुकरबर्गने काय म्हटले?

मार्क झुकरबर्गने सांगितले की, जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे लागू आहेत. सर्वच कायद्यांवर आम्ही सहमत असू असे नाही. पाकिस्तानच्या बाबतीत हेच झाले होते. फेसबुकवर शेअर झालेल्या चित्राला ईशनिंदेचे प्रकरण माणून माझ्याविरोधात खटला भरला. मला दोषीही ठरवले. जगातील अनेक देशांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य पायदळी तुडवले जात आहेत. जगात असे अनेक देश आहेत, जिथे आपल्या अभिव्यक्ती स्वातत्र्यांचा काहीच ताळमेळ बसत नाही. त्यांच्या मताप्रमाणे त्यांना नको असलेला कटेंट आम्ही फेसबुकवरून हटविला पाहिजे. तर काही देशातील सरकार तर आम्हाला कारागृहात टाकण्याची तयारी करतात.

मार्क झुकरबर्गने पुढे म्हटले की, पण पाकिस्तानला जाण्याचा माझा कोणताही विचार नाही, त्यामुळे आता तरी मला काही चिंता नाही.