केरळ उच्च न्यायालयाचा सवाल

थिरुवनंतपूरम : करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्याविरोधात याचिका केलेल्या व्यक्तीस केरळ उच्च न्यायालयाने सवाल केली की, प्रमाणपत्रावरील या छायाचित्राची तुम्हाला लाज का वाटते? तुम्हाला तुमच्या पंतप्रधानांची लाज का वाटते? प्रत्येकाची वेगवेगळी राजकीय मते असतात. पण, शेवटी मोदी हे आपल्या सर्वांचे पंतप्रधान आहेत, असेही न्यायालय म्हणाले.

न्या. पी. व्ही. कुन्हिकृष्णन यांनी याचिकाकर्ते पीटर म्यालिपरम्पिर यांना हा प्रश्न विचारला. पीटर यांनी पंतप्रधानांच्या छायाचित्राशिवाय लस प्रमाणपत्र देण्याची मागणी केंद्राकडे केली होती, पण त्यांना सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. लशीच्या दोन्ही मात्रांसाठी आपण पैसा मोजला आहे. त्यामुळे लस प्रमाणपत्र ही आपली खासगी बाब आहे. त्यावर आपली वैयक्तिक माहिती आहे. त्यामुळे या खासगी बाबीत कोणतेही अतिक्रमण होणे योग्य नाही, असे पीटर यांचे म्हणणे आहे.

न्यायमूर्ती म्हणाले की, ‘‘पीटर हे न्यायालयाचा वेळ वाया घालवित आहेत. शंभर कोटी लोकांपैकी कोणाचाही पंतप्रधानांच्या छायाचित्राला विरोध नाही. मग तुमचाच विरोध का? मी हे समजून घेऊ इच्छित आहे.’’  

Story img Loader