लेबेनॉनमध्ये तीन दिवसांपूर्वी अर्थात १७ सप्टेंबर रोजी ठिकठिकाणी स्फोट झाल्यानंतर जगभरात चर्चा सुरू झाली. इस्रायल व हेझबोला यांच्यातील थेट युद्धानं लेबेनॉनमध्ये एकाच वेळी जवळपास २८०० पेजरमध्ये छुप्या पद्धतीने स्फोट घडवून आणले आणि अवघ्या जगासमोर इस्रायलची छुपी युद्धनीती उघड झाली. या अप्रत्यक्ष हल्ल्यामध्ये इस्रायलनं तब्बल २८०० हेझबोला सदस्यांना एकाच वेळी लक्ष्य केलं. यात १० ते १५ दहशतवादी ठार झाले असून २५०० हून जास्त जखमी झाले आहेत. पण इस्रायलकडे इतकी संहारक अस्र असूनही त्यांनी पेजरचाच पर्याय का निवडला? त्याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संपर्कासाठी इतकी माध्यमं असताना हेझबोलानंही पेजरचीच निवड का केली?

इस्रायलची गुप्तचर यंत्रणा असणाऱ्या मोसादनं अत्यंत शिताफीनं आणि कमालीच्या नियोजनबद्ध पद्धतीने हेझबोलाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केलं. मोसादनं हे पेजर बनवणाऱ्या तैवानमधील गोल्ड पोलो कंपनीला हाताशी धरून हे सारं घडवून आणल्याचं आता समोर येत आहे. मात्र, या कंपनीनं हे पेजर आपण बनवले नसून युरोपातील एका फर्मनं बनवल्याचा दावा केला आहे. हेझबोलाकडून सदस्यांमध्ये संपर्क साधण्यासाठी पेजर खरेदी केले जाणार असल्याचा सुगावा मोसादच्या अधिकाऱ्यांना लागला. त्यांनी पेजर बनवणाऱ्या कंपनीशी संगनमत करून या पेजरमध्ये विशिष्ट स्फोटकांची क्षमता असणाऱ्या मिनी चिप बसवल्या. या रिमोट ट्रिगर प्रणालीनं सज्ज होत्या.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
shivsena thackeray groups protest march in Kalyan over minor girls murder case
कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?

हेझबोलानं आपल्या सदस्यांसाठी तब्बल ५ हजार पेजरची खरेदी केली. काही महिने त्यांनी या पेजरचा वापरही केला. किंबहुना, इस्रायलनं त्यांना या पेजरचा वापर करू दिला. त्यानंतर वेळ येताच १७ सप्टेंबर रोजी एकाच वेळी या पेजरमधील स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. या सगळ्या पेजरवर एकाच वेळी एक संदेश पाठवण्यात आला. तो वाचण्यासाठी पेजरवरचं बटण संबंधित हेझबोला दहशतवाद्यानं दाबलं. नेमका त्याचवेळी स्फोट झाला. या स्फोटात काही दहशतवादी मारले गेले. अडीच हजार दहशतवादी जखमीही झाले. त्यात काही सामान्य नागरिकही जखमी झाल्याचं समोर आलं आहे.

Lebanon Pager Blast : इस्रायलच्या मोसादने साध्या पेजरचं विध्वंसक अस्त्रात कसं केलं रुपांतर? हेझबोलाचे धाबे दणाणले

पेजरच का?

दरम्यान, मोसाद आणि हेझबोला या दोन्ही संघटनांकडून पेजरचीच निवड का करण्यात आली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हेझबोलाच्या दृष्टीने विचार करता पेजर हे सुरक्षेच्या दृष्टीने इतर कोणत्याही संपर्कासाठीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा अधिक श्रेयस्कर असल्याचा त्यांनी फायदा घेतला. पेजरच्या वापरामुळे अत्याधुनिक कम्युनिकेशन ट्रेसिंग यंत्रणांना या दहशतवाद्यांच्या हालचालींवर नजर ठेवणं कठीण होऊन बसेल, म्हणून हेझबोलाकडून पेजरची निवड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

What is a Pager: पेजर म्हणजे काय? लेबनानमध्ये पेजरचा स्फोट कसा काय झाला?

इस्रायलय आणि मोसादच्या दृष्टीने विचार केला तर पेजर हे एकाच वेळी मोठ्या संख्येनं हेझबोलाच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचं एक प्रभावी माध्यम ठरलं. कारण हे पेजर वैयक्तिक वापरासाठी असल्यामुळे त्या त्या व्यक्तीलाच लक्ष्य करणं सोपं होतं. शिवाय, यामुळे लेबेनॉनमधील हेझबोलाच्या पूर्ण नेटवर्कलाच एक मोठं भगदाड पाडण्याची आणि त्यातून हेझबोलाला मुळापासून कमकुवत करण्याची संधी मोसादला उपलब्ध झाली. हेझबोलाकडून पेजर खरेदी केले जाणार असल्याचा सुगावा मोसादला आधीच लागल्यामुळे त्यांना पेजरमध्ये छोट्या आकारातली स्फोटकं आधीच फिट करणं शक्य झालं, असा कयास आता आंतरराष्ट्रीय स्तरावर बांधला जात आहे.

Story img Loader