Italy village bans people from getting ill : इटलीमधील कॅलाबरीया येथील बेलाकास्ट्रोमध्ये तेथील मेयरने नागरिकांनी तात्काळ उपचारांची गरज भासेल अशा आजारांपासून दूर राहाण्याचा सरकारी आदेश जारी केला आहे. एकदंरीत या गावात लोकांना आजारी पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या फतव्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. पण या निर्णयामागे एक हृदयद्रावक कारण दडलेले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीबीसीने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, या शहराचे मेयर अँटोनियो टॉर्चिया यांनी त्यांच्या या अध्यादेशात नागरिकांना उपचाराची गरज पडू नये म्हणून धोका उत्पन्न होईल अशी कामे, अपघात किंवा कष्टाच्या कामापासून दूर राहण्यास सांगितले आहे.

नेमकं कारण काय?

मेयरने टॉर्चिया यांनी या आदेशाबद्दल माहिती देताना माध्यमांना सांगितले की, ही घोषणा काही प्रमाणात उपरोधात्मक आहे, पण याचा मुख्य उद्देश आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष वेधून घेणे हा आहे. बेलक्रास्ट्रो शहराची लोकसंख्या सुमारे १,२०० आहे. तसेच येथे अर्ध्याहून अधिक लोक हे ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे आहेत. विशेष बाब म्हणजे ते आजारी पडले तर त्यांच्या उपचारासाठी दूर-दूर पर्यंत रुग्णालयाची कुठलीही सोय नाही. या गावापासून जवळचा अपघात आणि आपत्कालीन विभाग सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर आहे. या विभागापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता किंवा साधने उपलब्ध नाहीत. तसेच गावातील आरोग्य केंद्र हे कामाचे तास संपल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी बंद असते.

कॅलाब्रिया हा दुर्गम भाग असून येथे राहाणाऱ्या नागरिकांना सामाजिक आणि आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. या भागत कर्ज आणि चांगल्या व्यवस्थापनाच्या आभावामुळे २००९ पासून १८ रुग्णालये बंद झाली आहेत. यामुळे नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळत नाही.

हेही वाचा>> रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या L&T च्या अध्यक्षांना कर्मचाऱ्यांपेक्षा ५०० पट अ…

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, टॉर्चिया गावातील आरोग्य सुविधांविषयी बोलताना म्हणाले की “आपण जर अत्यावश्यक सेवा पुरवल्या नाहीत तर ही शहरे, ही गावे येत्या १० वर्षांत मरतील”. स्थानिक रहिवाशांनी मेयरने काढलेल्या आदेशाला पाठिंबा दिला आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांनी वर्षानुवर्षे दुर्लक्षित केलेली समस्या या निर्णयामुळे प्रभाविपणे मांडली जात असल्या नागरिकांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why italy village belcastro bans residents from falling ill marathi news rak