पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ( ९ फेब्रुवारी ) राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला राज्यसभेत उत्तर दिलं. तेव्हा पंतप्रधानांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि गांधी कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. पण, त्यांच्या वारसदारांना नेहरुंचं आडनाव लावण्यास काय भीती आहे? का नेहरू आडनाव लावण्यास लाज वाटते, असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “कोणत्याही कार्यक्रमात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा उल्लेख झाला नाहीतर काहींच्या डोक्यावरील केसं उभं राहतात. आमच्याकडून कधीतरी चुकून नाव राहिलं गेलं असेल. ते आम्ही ठिक करु शकतो. कारण, ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. मात्र, त्यांच्या वारसातील कोणत्याही व्यक्तीला नेहरूंचं आडनाव लावण्यास का भिती वाटते. का नेहरुंचं आडनाव लावण्यास लाज वाटते.”

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप

हेही वाचा : “…तर तुमच्या मफलरचीही ‘जेपीसी’ चौकशी करावी लागेल”, भाजपाचं मल्लिकार्जुन खरगेंना प्रत्युत्तर

पंतप्रधानांच्या भाषणावेळी विरोधकांनी ‘मोदी-अडाणी’, ‘भाई-भाई’ अशा घोषणांनी संसद दणाणून सोडली. याचाही पंतप्रधान मोदींनी समाचार घेतला. “काही लोकांचा व्यवहार हा निराशजनक आहे. या सदस्यांना मी सांगू इच्छितो की, ‘जेवढा तुम्ही चिखल उडवणार, तेवढं कमळ उगवणार’. आमच्या यशात तुमचं योगदान विसरणार नाही,” असा टोमणा पंतप्रधानांनी विरोधकांना लगावला.

Story img Loader