गौतम अदाणी प्रकरणात जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही असं स्पष्ट आणि परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसंच त्यासाठी त्यांनी कारणही दिलं आहे. एवढंच नाही तर देशात इतर प्रश्नही अदाणी यांच्या प्रकरणापेक्षा महत्त्वाचे आहेत. हिंडेनबर्ग हे नावही मी कधीच ऐकलेलं नाही. त्या कंपनीच्या अहवालावर विश्वास कसा ठेवायचा असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच JPC म्हणजेच संयुक्त संसदीय समितीच्या विरोधातच त्यांनी भूमिका घेतली आहे.

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?

“संयुक्त संसदीय सदस्यांच्या समितीत दोन्ही सभागृहांचे नेते असतात. ज्या पक्षांचे सदस्य जास्त त्यांना या समितीत जास्त जागा मिळतात. विरोधकांचे सदस्य कमी, सत्ताधाऱ्यांचे सदस्य अधिक असंच असतं. उदाहरणार्थ २१ सदस्यांची समिती नेमायची असं ठरलं तर त्यातले १५ सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे असतील. अशा प्रकारची समिती नेमल्यानंतर सत्य कसं बाहेर येणार? अदाणी प्रकरणाची चौकशी गांभीर्याने व्हायला हवी. त्यामुळे जेपीसी अर्थात संसदीय संयुक्त समितीच्या ऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने चौकशी करावी अशीच आमची मागणी आहे. माझा जेपीसीला विरोध नाही पण जेपीसी ही बहुमत बळावर काम करणारी समिती आहे. त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती प्रभावी ठरेल.” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Image of Dr. Manmohan Singh
World On Manmohan Singh Death : “आर्थिक सुधारणांचे शिल्पकार ते अनुत्सुक पंतप्रधान”, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जागतिक माध्यमांची प्रतिक्रिया

शरद पवार पुढे म्हणाले की, “संयुक्त संसदीय समिती ही अशी समिती आहे ज्या समितीत विरोधी पक्षाचे नेते कमी आणि सत्ताधारी पक्षाचे लोक अधिक याचा ज्याची चौकशी नीट करावी अशी अपेक्षा त्यावर शंका व्यक्त करण्याला वाव आहे.” पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, “काँग्रेस किंवा इतरांच्या मताचा मी सन्मान करतो, पण मी माझं मतंही सांगतोय. आता १९ पक्षांचं एकमत आहे, पण त्यातील १९ पक्षांना जेपीसी समितीत स्थान मिळणार नाही.”

देशापुढे हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत

मला असं वाटतं की आपल्या देशासमोर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. उदाहरणार्थ बेरोजगारी, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या. हे तीन प्रश्न देशासमोरचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. अदाणींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं गेलं असं वाटतं आहे. हिंडेनबर्ग हे नावही मी कधी ऐकलेलं नाही. अशात अदाणी यांच्या प्रश्नांपेक्षा महत्त्वाचे मुद्दे देशात आहेत. ते सोडवण्यावर विरोधकांनी भर दिला पाहिजे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Story img Loader