आसाराम बापूंनी अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगिक छळाप्रकरणी, देशात महिलांवर होणाऱया अत्याचारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त कऱणाऱया भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सुषमा स्वराज यावेळी गप्प का? असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला आहे.
तसेच आसाराम बापूंच्या समर्थकांनी शनिवारी जोधपूर येथील आक्षमाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींवर केलेल्या हल्ल्याचा दिग्विजय सिंह यांनी निषेध व्यक्त केला. दिग्विजय सिंह ट्विटर म्हणाले की, आसाराम बापूंवर लैंगिक छळ केल्याची सर्वत्र टीका उमटत आहे, तरी भाजप नेत्यांनी यावर चुप्पी साधली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात नेहमी आवाज उठविणाऱया भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यामुद्द्यावर गप्प का? त्यांनी आपले म्हणणे स्पष्ट करायला हवे. असेही दिग्विजय म्हणाले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-09-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why sushma swaraj is silent on asaram issue asks digvijay singh