जरा विचार करून पाहा, एखादी मेलेली व्यक्ती अचानक तुमच्या समोर आली तर तुमची त्यावर प्रतिक्रिया काय असेल? अर्थातच तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तुम्हाला त्या व्यक्तीला पाहून मोठा धक्का बसेल. ती व्यक्ती तुमच्या जवळची असेल आणि त्या व्यक्तीवरील अंत्यसंस्कार देखील तुम्ही पाहिलेले असतील तर तुम्हाला कदाचित चक्कर येईल. असंच काहीसं एका विधवा महिलोसोबत घडलं आहे. एका महिलेने तिच्या दिवंगत पतीला एका रेस्टॉरंटच्या प्रोमोमध्ये जेवणाचा आस्वाद घेताना पाहिलं. हा प्रोमो पाहून ती सुन्न झाली. तिला विश्वास बसत नव्हता की, ती तिच्या पतीला एका जाहिरातीत पाहात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लुसी वॉटसन असं या महिलेचं नाव असून तिचं वय ५९ वर्ष इतकं आहे. तिचे पती हॅरी डोहर्टी यांचं ९ वर्षांपूर्वी निधन झालं आहे. ते अनेक महिन्यांपासून आजारी होते. आजारपणातच उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. परंतु लुसीने जेव्हा त्यांच्या पतीला एका भारतीय रेस्टॉरंटच्या जाहिरातीत पाहिलं तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ९ वर्षांपूर्वी मेलेला माणूस अचानक असा जाहिरातीत कसा काय दिसू शकतो असा प्रश्न तिला पडला. तिला असं वाटलं की, कदाचित हा प्रोमो तिच्या पतीच्या मृत्यूपूर्वी चित्रीत केलेला असू शकतो.

प्रोमो पाहताना जेव्हा लुसीने तिच्या नवऱ्याला पाहिलं तेव्हा तिला मोठा धक्का बसला. लुसी फेसबूकवर स्क्रोल करत असताना तिने वेस्ट ससेक्सच्या चिचेस्टर येथील एक भारतीय रेस्टॉरंट द स्पाईस कॉटेजची जाहिरात पाहिली. ही जाहिरात पाहात असताना तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण तिने या जाहिरातीत तिच्या ९ वर्षांपूर्वी निधन झालेल्या पतीला पाहिलं. लुसीने मेल ऑनलाईनला सांगितलं की, व्हिडीओ पाहून मी जोरात किंचाळले, कारण त्यात मी हॅरीला पाहिलं. तो व्हिडीओमध्ये चिकन कोरमा खात असावा. कारण चिकन कोरमा हा त्याचा आवडता पदार्थ होता.

रेस्टॉरंटने काय म्हटलंय?

या महिलेचं असं म्हणणं आहे की, तिने जाहिरातीत ज्या व्यक्तीला पाहिलं ती व्यक्ती हॅरीच आहे. तिने जवळपास ३० वेळा हा व्हिडीओ पाहिला आहे आणि तिला खात्री आहे की व्हिडीओतली व्यक्ती म्हणजेच तिचा दिवंगत पती हॅरी आहे. तसेच या व्हिडीओमध्ये तिचा मुलगा अ‍ॅलेक्स देखील आहे. तिचं म्हणणं आहे की, हा कुठला तरी जुना व्हिडीओ असावा. परंतु रेस्टॉरंटने म्हटलं आहे की, आम्हाला खेद वाटतो की, लुसी यांचे पती या जगात नाहीत. परंतु हा प्रोमो आम्ही गेल्या आठवड्यात चित्रीत केला आहे.