Crime News : आपल्या आईच्या समोरच पत्नीने पतीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक महिला तिच्या पतीला चांगलीच मारहाण करताना दिसते आहे. ज्याला मारहाण झाली तो माणूस लोको पायलट म्हणून काम करतो.

कुठे घडली ही घटना?

मध्य प्रदेशातील सतना या ठिकाणी राहणारा लोको पायलट आणि त्याच्या पत्नीचा वाद झाला. यानंतर या महिलेने तिच्या पतीला बेदम मारहाण केली. पत्नी छळ करते, मारहाण करते म्हणून या लोको पायलटने त्याच्या खोलीत एक छुपा कॅमेरा बसवला होता. कॅमेरात आईच्या देखतच महिला तिच्या पतीला मारहाण करताना दिसते आहे. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा लोको पायलट त्याच्या पत्नीच्या छळाला कंटाळला आहे. त्याने यासंदर्भात पोलिसात तक्रारही केली. मात्र काहीही उपयोग झाला नाही, त्यामुळे त्याने शेवटी खोलीत छुपा कॅमेरा बसवला. या कॅमेरात ही सगळी घटना कैद झाली आहे आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लवकेश कुमार असं लोको पायलटचं नाव आहे

मध्य प्रदेशातील सतना या ठिकाणी राहणाऱ्या या लोको पायलटचं नाव लवकेश असं आहे. लवकेशची सासू म्हणजेच त्याच्या पत्नीची आईही या व्हिडीओत दिसते आहे. लवकेशची सासूही मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र महिलेने काहीही ऐकलं नाही. ती लवकेशच्या छातीवर लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसते आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता सतना येथील पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली आहे.

व्हायरल व्हिडीओत काय दिसतं आहे?

लवकेश प्रकरणातला जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात लवकेशला त्याची पत्नी मारहाण करताना दिसते आहे. तसंच तिच्यासह तिची आई आहे असंही या व्हिडीओत दिसतं आहे. तर शेजारी मेहुणा आहे आणि त्याच्या हाती एक मूलही आहे. या दोघांमधला वाद कुठल्या गोष्टीवरुन झाला हे समजू शकलेलं नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी काय म्हटलं आहे?

सोशल मीडियावर रेल्वे कर्मचारी लवकेश कुमार यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांना त्यांच्या पत्नीकडून मारहाण होताना दिसते आहे. २१ मार्चला लवकेश कुमार यांनी त्यांची पत्नी, सासू आणि मेहुणा या तिघांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. विविध कलमांअन्वये आम्ही आता गुन्हा दाखल केली आहे. ७ एप्रिलला आम्ही त्यांना न्यायालयात हजर करणार आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली.