बिहारमधील मासे व्यवसायिक मोहम्मद मिया यांचा २२ मे रोजी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी पोलिसांनी मोठे धागेदोरे हाती लागले आहेत. मृत मोहम्मद मियां यांची पत्नी नूरजहां खातून आणि तिचा प्रियकर नौशाद आलम हे या खून प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं आहे. सुपारी देऊन मोहम्मद मियां यांचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपालगंज जिल्ह्यातील लाढपूर या गावामधील मोहम्मद मियां यांची पत्नी नूरजहां खातूनचे नौशाद आलमबरोबर अनैतिक संबंध होते. त्यामुळेच मोहम्मद मियां आपल्या पत्नीला मारहाण करायचा. याच त्रासाला कंटाळून नूरजहां खातूनने प्रियकराबरोबर मिळून पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोन जणांना सुपारी देण्यात आली होती.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…

आरोपींनी २८ हजारात बंदूक आणि काडतुसांची केली खरेदी

अटकेत असलेला आरोपी मंसूर आलम आणि परवेज आलम यांनी पोलीस तपासात सांगितलं की, सहा मुलांची आई असलेल्या नूरजहां खातूनने ५० हजार रुपयांत पतीच्या खूनाची सुपारी दिली होती. मिळालेल्या पैशातून २८ हजार रुपयांची एक बंदूक आणि ४ जिवंत काडतुसे विकत घेण्यात आली. घटनेच्या रात्री नूरजहां फोनवरून आदेश देत खिडकीतून सर्व पाहत होती.

अलीकडेच मोहम्मद दुबईतून आले होते

पोलिसांनी सांगितल्यानुसार, मोहम्मद मियां आपल्या घरासमोरील खाटावर झोपले होते. तर, पत्नी घरातून खिडकीतून आरोपींना निर्देश देत होती. अलीकडेच मोहम्मद मियां दुबईतून आले होते. आरोपी नूरजहां म्हणाली की, “पती पत्नीसारखा व्यवहार करत नसे. तसेच, सातत्याने मारहाण करायचा.”

चार आरोपींना केली अटक

गोपालगंज पोलीस अधिकारी स्वर्ण प्रभात यांनी म्हटलं की, “२२ मे रोजी मोहम्मद मियां यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. यासाठी एसआयटीअंतर्गत चौकशी करण्यात आली. या तपासात मृत मियां यांच्या पत्नीचं अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं. त्याला विरोध असल्यानेच सुपारी देऊन मियां यांचा खून करण्यात आला. याप्रकरणात चार जणांचा अटक करण्यात आली आहे.”