सरकारी सेवेत असणा-या व्यक्तींच्या पत्नींना नव-याचा पगार जाणून घेण्याचा अधिकार आहे, तसेच पगाराचा सर्व तपशील सार्वजनिकरित्या कुणालाही पाहण्यास उपलब्ध असला पाहिजे असं केंद्रीय माहिती आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे. दिल्ली सरकारच्या गृह (सामान्य) विभागात नोकरीला असणा-या सेहरावत यांच्या पत्नी ज्योती सेहरावत यांनी आपल्या पतीच्या पगाराचा तपशील जाणून घेण्याबाबत माहितीच्या अधिकाराचा वापर केला होता, त्यावर माहिती आयुक्त एम. श्रीधर आचार्यूलू यांनी सदर खुलासा केला. अशा प्रकारची माहिती न पुरवल्याबदद्ल दंडही आकारला जाऊ शकतो, असंही ते म्हणाले. आपल्या पगाराचा तपशील कुणाला पुरवण्यात येऊ नये, अशा प्रकारचे लेखी पत्र सेहरावत यांनी सदर विभागात दिले होते, त्यावर हा खुलासा करण्यात आला आहे.
प्रत्येक पत्नीला फक्त आपल्याच नव-याच्या पगाराचा तपशील नव्हे तर पगार हे निर्वाहाचे साधन असल्याने दुस-यांच्यांही पगाराचा तपशील माहित असण्याचा अधिकार आहे, असं आचार्यूलू म्हणाले. सरकारी सेवेत असणा-या लोकांच्या पगाराचा तपशील हा कोणा तृतीय पक्षाचा तपशील नसून प्रत्येकाने माहिती अधिकाराच्या भाग ४(१)(ब)(एक्स) अंतर्गत स्वत:हून ही माहिती उघड करणे आवश्यक आहे.
सरकारी सेवेत असणा-यांच्या पगाराचा तपशील हा तृतीय पक्षाची माहिती नसून सार्वजनिक प्राधिकरणांकडून अशा प्रकारच्या माहितीच्या अधिकाराची चौकशी त्यांना नाकारता येणार नाही, असंही ते पुढे म्हणाले.
बायकोला नव-याचा पगार जाणून घेण्याचा अधिकार – केंद्रीय माहिती आयोग
सरकारी सेवेत असणा-या व्यक्तींच्या पत्नींना नव-याचा पगार जाणून घेण्याचा अधिकार आहे, तसेच पगाराचा सर्व तपशील सार्वजनिकरित्या कुणालाही पाहण्यास उपलब्ध असला पाहिजे असं केंद्रीय माहिती आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे.
First published on: 20-01-2014 at 01:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife has right to know husbands salary cic