दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीच्या तुरुंगात असल्याने दिल्लीतील सरकार संकटात आहे. सध्या कोर्टाने अरविंद केजरीवाला यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. परंतु, यामुळे अरविंद केजरीवाल यांचं मुख्यमंत्री पद धोक्यात आलं आहे. अरविंद केजरीवाल यांना त्यांचं मुख्यमंत्री पद सोडावं लागलं तर या पदावर कोण असणार? असा प्रश्न उपस्थित होतोय. सोशल मीडियावरील चर्चेनुसार अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

१९९७ साली बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळाप्रकरणी अटक झाली होती. त्यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी राबडी देवी यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज घेतला होता. अरविंद केजरीवाल यांचंही त्याप्रमाणेच प्रकरण असल्याने सुनीता देवीच मुख्यमंत्री पदी विराजमान होतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
MIT suspends Indian-origin PhD student
MIT Suspends PhD Student : पॅलेस्टिनवर लेख लिहिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेतील MIT मधून हकालपट्टी; हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
What Prakash Ambedkar Said?
Prakash Ambedkar : परभणी बंदला हिंसक वळण; प्रकाश आंबेडकरांचा इशारा, “२४ तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..”
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांना ट्रायल कोर्टात सादर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. तर, अरविंद केजरीवाल यांनी या अटकेविरोधात दिल्ली उच्च न्यायलयात धाव घेतली असून तातडीच्या सुनावणीची मागणी केली होती. परंतु, कोर्टाने तातडीची सुनावणी फेटाळली असून होळीच्या सुट्ट्यांनंतर कामकाज सुरू झाल्यावर सुनावणी घेतली जाणार आहे.

हेही वाचा >> अरविंद केजरीवाल यांच्या ईडी चौकशीत काय आढळलं? गोवा विधानसभा निवडणुकीत ‘इतक्या’ कोटींचा हवाला

दरम्यान, सुनीता केजरीवाल यांनी आज अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडीत भेट घेतली. या भेटीत अरविंद केजरीवाल यांनी जनतेशी संदेश पाठवला होता. हा संदेश सुनीता केजरीवाल यांनी जनतेपर्यंत पोहोचवला. “कोणतेही तुरुंग मला आत ठेवू शकत नाही, आणि मी बाहेर येऊन माझी वचने पूर्ण करीन”, असं आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी दिलं आहे.

लोककल्याणाचे उपक्रम सुरू ठेवा

व्हिडिओ संदेशात, अरविंद केजरीवाल यांनी अटक करूनही देशाची सेवा करण्याची आपली वचनबद्धतेचं वचन दिलं आहे. आप कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांबद्दल वैर बाळगू नये असंही केजरीवाल म्हणाले. तसंच त्यांच्या अनुपस्थितीत सामाजिक आणि लोककल्याणाचे उपक्रम सुरू ठेवण्याच्या महत्त्वावर जोर दिला.

Story img Loader