उत्तर प्रदेशातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे महिला दिराच्या प्रेमात पडली होती. यातून महिलेने पतीचा खून केला आहे. या नंतर मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये खड्डा खांदून पुरला आहे. याप्रकरणी आरोपी महिला आणि दिराला अटक केली आहे.
मुजफ्फरनगर मधील मांडला गावात ही घटना घडली आहे. येथील सागर ६ जूनपासून बेपत्ता होता. यानंतर कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पण, पोलिसांना धागे-दोरे हाती लागत नव्हते.
हेही वाचा : लुंगी व नाईटी घालून फिरू नका! सोसायटीचा विचित्र नियम, अधिकारी म्हणाले, “स्त्रियांनी…”
अशातच पोलिसांना पत्नी आशिया आणि सावत्र भाऊ सुहैल यांच्यावर शंका आली. पोलिसांनी आशिया आणि सुहैल यांना चौकशीसाठी बोलावलं. मात्र, चौकशीत दोघांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्हा कबूल केला.
हेही वाचा : पोटच्या मुलांकडूनच वृद्ध मातांचा छळ, सर्वेक्षणाअंती भारतातली धक्कादायक आकडेवारी समोर
दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते, ज्यात सागर अडथळा ठरत होता. त्यामुळेच ६ आणि ७ जूनच्या रात्री सागरचा खून केला. नंतर सागरचा मृतदेह सांडपाण्याच्या टाकीत टाकला. ९ जूनला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत खड्डा खोदून मृतदेह पुरला. पोलीस अधिकारी सत्यनारायण यांनी सांगितलं की, “मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.”