Wife Swapping ची पार्टी पोलिसांनी उधळली असून हे स्वॅपिंग चालवणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. चेन्नईतल्या ईस्ट कोस्ट भागात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. एका स्थानिकाने पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर छापा मारत पोलिसांनी ही कारवाई केली. ‘वाईफ स्वॅपिंग’च्या नावाखाली सुरु असलेलं वेश्याव्यवसायाचं रॅकेट उधळण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
पोलिसांनी काय सांगितलं आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या आठ लोकांना अटक करण्यात आली आहे ते आठ लोक चेन्नईतल्या बऱ्याच भागांमध्ये वाईफ स्वॅपिंग पार्टीजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असतं. कोईंबतूर, मदुराई, सालेम या भागांमध्ये ‘वाईफ स्वॅपिंग’च्या पार्ट्यांच्या नावाखाली वेश्याव्यसाय सुरु होता. पोलिसांनी आता या आठ जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सेंथिल कुमार, चंद्रमोहन, कुमार, शंकर, वेलराज, पेरासन, सेल्वन आणि व्यंकटेशकुमार या आठ जणांना अटक केली आहे. हे आरोपी अविवाहित तरुणांना हेरत असत आणि त्यांची काही महिलांशी ओळख करुन देत असत. ‘वाईफ स्वॅपिंग पार्टीज’च्या नावे वेश्याव्यवसाय चालवण्यात हे सगळे गुंतलेले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
सोशल मीडिया पेजही केलं होतं तयार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींनी ‘वाईफ स्वॅपिंग’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवण्यासाठी एक सोशल मीडिया पेजही तयार केलं होतं. त्या माध्यमातून हे वेश्याव्यवसायाचं रॅकेट चालवत होते अशीही माहिती पोलिसांनी दिली. पुरुषांकडून १३ ते २५ हजार रुपयांची मागणी केली जात असे. त्यानंतर पुरुषांना महिलांची ओळख करुन दिली जात असे. एका महिलेच्या जाळ्यात तो पुरुष अडकला की त्याला इतर महिलांचं आमिषही दाखवलं जात असे. पोलिसांनी घटनास्थळावरुन या आठ जणांना अटक केली आहे. तसंच ३० ते ४० या वयोगटातील महिलांचीही सुटका करण्यात आली. या महिला विवाहित असून त्यांना पैशांचं आमिष दाखवलं गेलं होतं असंही समजतं आहे.
एका फ्लॅटमध्ये हा सगळा प्रकार सुरु होता. याबाबत शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. त्यांना सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. या फ्लॅटमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावर पुरुष आढळले. तसंच घरात गाणी लावण्यात आली होती आणि मद्यही दिलं जात होतं. एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे वाईफ स्वॅपिंगच्या नावाखाली सुरु असणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली आहे.