Crime News : पश्चिम बंगालमध्ये महिलेने तिच्या पतीला फसवल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आपल्या आर्थिक तंगीतून बाहेर येण्यासाठी तसेच आपल्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी या महिलेने एक अत्यंत क्रूर योजना आखली. तिने स्वत:च्याच पतीला फूस लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्यास तयार केलं आणि याच्या माध्यमातून पतीची किडनी १० लाखांना विकली. विशेष बाब म्हणजे किडनी विकून पैसे मिळताच ही महिला रातोरात पतीला सोडून फरार झाली. पश्चिम बंगालच्या हावडा येथे ही घटना घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील संकरेल भागात ही घटना घडली असून आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या महिलेने तिच्या पतीला कित्येक महिने फूस लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार केलं. पण तिच्या मनात मात्र वेगळाच प्लॅन शिजत होता. ही शस्त्रक्रिया त्याच्या आरोग्याच्या कारणास्तव गरजेची असल्याचे तिने पतीला पटवून दिले. अखेर यशस्वीरित्या १० लाखांना त्याची किडनी विकल्यानंतर हे पैसे बँकेत जमा करणार असल्याचे सांगून ती पैसे घरी घेऊन आली.

नेमकं काय झालं?

पण अचानक रात्रीतून पत्नी गायब झाल्याने पतीला चांगलाच धक्का बसला. जेव्हा त्याने पत्नीचा शोध घेतला तेव्हा ती एका पेंटरबरोबर बॅरकपूर परिसरात राहत असल्याचे त्याला आढळून आले आहे.

आपल्याबरोबर विश्वासघात झाल्याचे लक्षात अल्यानंतर त्या व्यक्तीने कुटुंबियांना बरोबर घेऊन तिला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण या महिलेने उलट त्यालाच घटस्फोटाची कागदपत्रे पाठवून देण्याची धमकी दिली. अखेप पत्नीकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात तिच्या विरोधात तक्रार दाखल केली.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाशी संबंधित कोणालाही अद्याप अटक झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife tricks husband to sells his kidney for 10 lakh elopes with painter and cash west bengal crime rak