भूकंपाची पूर्वसूचना जंगली उंदीर देऊ शकतात, असे पेरू या देशातील संशोधनात दिसून आले आहे. जगात इ.स.१९०० पासूनच्या मोठय़ा भूकंपांमध्ये १५ लाख लोक मरण पावले असून, नेपाळच्या आताच्या ७.७ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात ८ हजार लोक मरण पावले आहेत. काही जंगली प्राणी त्याची सूचना देऊ शकतात. त्यात जंगली उंदरांचा समावेश आहे.
तीन उपखंडांतून पेरूतील भूकंपाबाबत मिळालेल्या माहितीनुसार भूकंप होणार असेल, तर ते आधी जंगली उंदरांना कळते. २०११ मध्ये अँडियन खेडय़ात भूकंप झाला होता, त्या वेळी सात दिवस आधीच यानाचागा शेमिलेन नॅशनल पार्कमधील सर्व प्राण्यांनी पळ काढला होता व त्यांच्या हालचाली कॅमेऱ्याने टिपण्यात आलेल्या आहेत. हे सर्व प्राणी भूकंप होऊन गेल्यानंतर पुन्हा आले. संशोधकांच्या मते त्यांचे निष्कर्ष अंतिम नाहीत पण त्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार प्राण्यांना भूकंपाची पूर्वसूचना मिळत असते. वन्य प्राण्यांच्या हालचालींचा अभ्यास केला, तर आधीच भूकंपाची पूर्वसूचना मिळू शकते. भूकंपात भूगर्भातील दगडाचे थर हलतात व त्यामुळे विद्युतभार निर्माण होतो व जमिनीवरच्या पाण्यात तो येतो तसेच काही धनभारित आयन कमी उंचीच्या वातावरणात येतात. आयनभारित हवेमुळे प्राणी भूकंपाच्या आधी सैरभैर होतात व जास्त क्रियाशील होतात. त्यामुळे त्यांच्या हालचालींवरून भूकंपाचे पूर्वानुमान करता येते.
जंगली उंदरांच्या मदतीने भूकंपाचे पूर्वानुमान शक्य
भूकंपाची पूर्वसूचना जंगली उंदीर देऊ शकतात, असे पेरू या देशातील संशोधनात दिसून आले आहे. जगात इ.स.१९०० पासूनच्या मोठय़ा भूकंपांमध्ये १५ लाख लोक मरण पावले असून, नेपाळच्या आताच्या ७.७ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात ८ हजार लोक मरण पावले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-05-2015 at 01:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wild mouse wild mouse can help predict earthquakes