भाजपाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी घटनादुरुस्ती करण्याबाबतचे विधान केलं आहे. राज्यसभेत भाजपाचे दोन तृतीयांश बहुमत झाल्यानंतर घटनेत दुरुस्ती केली जाईल. काँग्रेसच्या काळात हिंदू समाजावर वर्चस्व गाजविण्यासाठी घटनेत नको ते बदल केले गेले. भाजपाचे बहुमत आल्यानंतर हे सर्व बदल पुर्ववत केले जातील, असेही हेगडे म्हणाले आहेत.

घटनादुरुस्ती केली जाईल

कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यात सिद्धपूर येथे एका सभेत बोलत असताना खासदार हेगडे म्हणाले की, आपल्याला संविधानात बदल करावे लागणार आहेत. काँग्रेसच्या काळात संविधानाच काही अनावश्यक बदल करण्यात आले, विशेषतः हिंदू समाजाला अंकित ठेवण्यासाठी हे बदल केले गेले होते. हे सर्व बदलायचे असेल तर दोन तृतीयांश बहुमताशिवाय पर्याय नाही.

निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला मोठा धक्का; खासदार ब्रिजेंद्र सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने अब की बार ४०० पारचा नारा दिला आहे. या घोषणेचा अर्थ उलगडून सांगताना खासदार हेगडे यांनी हे विधान केलं.

डॉ. आंबेडकरांच्या संविधानाची इतकी अडचण का?

खासदार हेगडे यांच्या या विधानावर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. घटनेत बदल करणे हा भाजपाचा निवडणुकीचा मुद्दा आहे का? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. एकेकाळी भाजपाचे खासदार हे संविधान बदलण्याची भाषा वापरत होते, आता ते संविधानात दुरुस्ती करण्याचे संकेत देत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या अंतर्गत राहण्यास भाजपाच्या नेत्यांना अडचण वाटते का? असा प्रश्न काँग्रेसने एक्स अकाऊंवर विचारला आहे.

वादग्रस्त विधानं करण्याचा जुना इतिहास

जानेवारी महिन्यातच खासदार हेगडे यांनी काही मशीद जमिनदोस्त करण्याचे वादग्रस्त विधान केले होते. हिंदू मदिरांना पाडून त्याठिकाणी मशीद बांधण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. २०१९ साली हेगडे यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. राहुल गांधी हे हिंदू कसे असू शकतात, यावर त्यांनी प्रश्न विचारताना म्हटले होते की, राहुल गांधी यांचे वडील मुस्लीम आणि आई ख्रिश्चन आहे. तसेच मागच्यावर्षी त्यांनी म्हटले होते की, हिंदू मुलींना हात लावणाऱ्यांना जिवंत ठेवले जाणार नाही.

Story img Loader