भारतीय जनता पक्षाचे(भाजप) अध्यक्ष राजनाथ सिंह सध्या नरेंद्र मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या दौऱयावर असलेले राजनाथ सिंह मोदींना व्हिसा मिळावा यासाठी तेथील संबंधीत प्रशासनाशी बातचीत करणार आहेत.
अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारण्याच्या मुद्दयावर राजनाथ सिहांनी खेद व्यक्त करत, मोदी लोकशाही पद्धतीने निवडून आलेले भारतातील एक लोकप्रिय नेते आहेत. त्यांना व्हिसा मिळावा यासाठी अमेरिका प्रशासनाशी बातचीत  करणार आहे. असे स्पष्ट केले आहे.
राजनाथ सिंह अमेरिकेत पाच दिवसांच्या दौऱयावार आहेत. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी अमेरिकेत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते स्वत: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यास नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरू शकतात या शक्यतेला त्यांनी दुजोरा दिला आहे.

Story img Loader