प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलन सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेचं दर्शन घडवणारा चित्ररथ सादर होणार आहे. हा चित्ररथ तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
प्रजासत्ताक दिनी येथील ऐतिहासिक राजपथावर होणा-या पथ संचलनासाठी ‘महाराष्ट्राच्या संतपरंपरे’ वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात.
दिल्लीच्या कँटॉनमेंट परिसरातील रंगशाळेत चित्ररथाचे वैविद्यपूर्ण काम पूर्णत्वास येत असून या चित्ररथावरील प्रतिकृती आकर्षण ठरत आहे. pic.twitter.com/RXM6vkMWBD— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) January 19, 2021
दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनी येथील ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथ संचलनासाठी ‘महाराष्ट्राच्या संतपरंपरे’वर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दिल्लीच्या कॅन्टोन्मेट परिसरातील रंगशाळेत चित्ररथाचे वैविध्यपूर्ण काम पूर्णत्वास येत असून या चित्ररथावरील प्रतिकृती आकर्षण ठरत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत गोरा कुंभार, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदी संतांसह महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुबक प्रतिकृती चित्ररथावर असणार आहेत.
महाराष्ट्राची संतपरंपरा आणि वैचारिक वारसा या चित्ररथातून प्रतित होणार असून यानिमित्ताने महाराष्ट्राच्या समृद्धीचे दर्शन याद्वारे देशाला घडणार आहे.