INDIA Meet in Mumbai आगामी लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष शक्यतो एकत्र लढण्याचा निर्धार करीत आहेत, असा आशयाचा ठराव आघाडीच्या बैठकीत संमत करण्यात आला. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये आघाडी होण्याबाबत साशंकता असल्यानेच ‘शक्यतो’ (अ‍ॅस फार अ‍ॅस पॉसिबल) हा शब्दप्रयोग  वापरण्यात आल्याचे सांगण्यात आले. इंडिया आघाडीच्या बैठकीत चार ठराव संमत करण्यात आले. तीन राजकीय तर चंद्रयान मोहिमेबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन करणारा ठराव करण्यात आला.

पश्चिम बंगालमधील जागावाटपाबाबत काय? असा सवाल  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. विविध राज्यांमधील जागावाटपाची प्रक्रिया लगेचच सुरू केली जाईल आणि विचारविनिमयाच्या माध्यमातून ही प्रक्रिया लवकरात लवकर संपविली जाईल, अशीही तरतूद राजकीय ठरावात करण्यात आली आहे.  देशाच्या विविध भागांमध्ये जाहीर सभा आयोजित करण्याचा ठराव करण्यात आला. या सभा चार ते पाच मोठय़ा शहरांमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत.  इंडिया आघाडी समन्वयक नेमणार नाही हे आता स्पष्ट झाले. त्याऐवजी १४ सदस्यीय समन्वय समिती नेमण्यात आली आहे. तसेच मानचिन्हावर सहमती होऊ शकली नाही. यामुळे लोकांकडून सूचना मागवून मानचिन्ह तयार करण्याच्या पर्यायावर चर्चा करण्यात आली.

Congress Priyanka Gandhi held road show in two constituencies in Nagpur on Sunday
प्रियंका गांधींचा आज नागपुरात या दोन ठिकाणी ‘रोड-शो’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ajit Pawar: ‘विलासराव देशमुख आघाडीचे सरकार चालविण्यात पटाईत’, अजित पवारांचे सूचक विधान; महायुतीला इशारा?
sharad pawar eknath shinde ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
राहुल गांधींचा प्रकाश आंबेडकरांना फोन; विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय चर्चा…
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
maharashtra richest candidate for assembly election 2024
पायाला फ्रॅक्चर, गोल्फ कार्टवर मतदारसंघात प्रचार; महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवाराची जोरदार चर्चा!

हेही वाचा >>> संसदेचे विशेष अधिवेशन : विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत चुळबुळ; मुंबईत अनौपचारिक चर्चा

इंडिया आघाडीचा समन्वयक कोण असेल, याची चर्चा गेली काही दिवस  सुरू होती. मुंबईच्या बैठकीत समन्वयक नेमण्यात येईल, असा अंदाज वर्तविला जात होता. समन्वयक कोण असावा यावरही सहमती झाली नव्हती.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी समन्वयकपद स्वीकारावे, असा प्रस्ताव होता. पण नितीशकुमार यांनी नकार दिला होता. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पुढे आले होते. पण ममता बॅनर्जी व आपचा काँग्रेसकडे पद सोपविण्यास आक्षेप होता. यातून इंडिया आघाडीचा कोणीच समन्वयक नेमला जाणार नाही. त्याऐवजी १४ जणांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.

‘विरोधकांकडे पर्यायी कार्यक्रमाचा अभाव’

नवी दिल्ली: विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत कोणताही पर्यायी कार्यक्रम देण्यात आला नाही अशी टीका भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने काही धोरण मांडले नाही. तसेच महिला, शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करणार? याची काहीही दिशा मुंबईतील या बैठकीत दिसली नाही असा आरोप प्रसाद यांनी केला. दहशतवादाविरोधात लढण्याचा कोणताही प्रामाणिक संकल्प या बैठकीत नव्हता. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे हाच एककलमी कार्यक्रम या विरोधकांच्या आघाडीचा असल्याचा टोला प्रसाद यांनी लगावला.

अशोक चव्हाण यांना महत्त्व

इंडियाच्या बैठकीत काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी व वेणुगोपाळ या चार प्रतिनिधींची  नावे देण्यात आली होती. शिवसेना व राष्ट्रवादीचे राज्यातील नेते बैठकीत सहभागी झाले होते. पण बैठक मुंबईत असताना काँग्रेसच्या राज्यातील कोणत्याच नेत्याला संधी देण्यात आली नव्हती. बैठक सुरू झाल्यावर काही वेळाने काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य अशोक चव्हाण यांना उपस्थित राहण्यासाठी निरोप देण्यात आला. बैठकीच्या व्यवस्थेत असलेले अशोक चव्हाण लगेचच बैठकीच्या ठिकाणी पोहचले.

हेही वाचा >>> “विरोधकांवर अहंकारी म्हणून टीका करतात, पण…”, शरद पवारांचं भाजपाला प्रत्युत्तर

समितीत शरद पवार ज्येष्ठ 

१४ सदस्यीय समितीत शरद पवार हेच सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. याचा अर्थ समन्वय समितीत पवारांच्या मताला अधिक महत्त्व असेल. शरद पवार वगळता अन्य कोणी ज्येष्ठ नेत्याचा या समितीत समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे समन्वय समितीत सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी शरद पवार यांना पार पाडावी लागेल.

मानचिन्हाचे अनावरण नाही

बैठकीच्या पहिल्या दिवशी मानचिन्हाचे (लोगो) अनावरण केले जाणार होते. पण दुसऱ्या दिवशी त्याचे अनावरण करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले.  आघाडीमध्ये यावर मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिले पण मानचिन्हावर आघाडीच्या घटक पक्षांमध्ये सहमती होऊ शकली नाही. लोकांकडून सूचना मागवून मानचिन्ह तयार केले जावे, अशी चर्चा बैठकीत झाली. या गोंधळात मानचिन्हाचे अनावरण लांबणीवर पडले.

केंद्र सरकारवर टीकास्त्र

आम्ही देशासमोरील समस्या सोडवण्यासाठी आज रणनीती आखली आहे. प्रत्येक राज्यात आज वेगळी स्थिती आहे. शेतकरी, कामगार, युवक यांच्या समस्या वेगवेगळय़ा आहेत. जनतेने ज्या भाजपच्या हातात देशाचा कारभार सोपवला, त्यांच्यावर जनता नाराज आहे. ज्यांचे पाय एकेकाळी जमिनीवर होते, त्यांच्या वर्तनात मोठा बदल झाला आहे.  चर्चेचे ज्यांना वावडे आहे,  ते अहंकारी आहेत. आम्ही इंडियाचा पर्याय दिला आहे. आम्ही आता थांबणार नाही. चुकीच्या रस्त्याने जाणार नाही. उलट अशा मंडळींना योग्य मार्गावर आणू. येणार नसतील तर त्यांना दूर करू. त्यासाठी इंडियातील सर्व पक्ष खांद्याला खांदा लावून एकत्र काम करतील.  – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

इंडिया आघाडी दिवसेंदिवस मजबूत होत आहे. आमची आघाडी विरोधी पक्षांची नव्हे तर देशप्रेमींची आहे.  हुकूमशाहीविरोधात, जुमलेबाजीविरोधात, भ्रष्टाचाराविरोधात, मित्रपरिवाराविरोधात आम्ही लढत आहोत. सर्वाना भयमुक्त जगता आले पाहिजे. देशात अत्याचार वाढले, पण उपययोजना का होत नाहीत. पेट्रोल, गॅस किती महाग केला, हे सर्वाना कळते.   उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

हेही वाचा >>> इंडिया आघाडीने मुंबईतल्या बैठकीत घेतले दोन मोठे निर्णय, राहुल गांधी माहिती देत म्हणाले…

‘इंडिया’ आघाडी पक्षांचे कडबोळे नसून १४० कोटी भारतीयांची एकजूट आहे. अनेक संस्था- संघटना आमच्या आघाडीत आज सामील होत आहेत. देशातला युवक रोजगार शोधत असताना केंद्र सरकार मात्र केवळ एका व्यक्तीसाठी काम करत असल्याचे पाहून दु:ख होते.  हे भ्रष्ट आणि अहंकारी असे सरकार आहे.  त्यांचा पराभव निश्चित आहे. आमची ‘इंडिया’ आघाडी तोडण्यासाठी अनेक मोठय़ा शक्ती आज काम करत आहेत. अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री

भारतीय संविधानातील तरतुदी अबाधित ठेवत लोकशाही संस्था जिवंत ठेवण्यासाठी भाजपला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक राज्यात जागावाटपाची मनमोकळी चर्चा केली, इतर पक्षाला समजून घेतले तर भाजपला २०२४ च्या निवडणुकीत हद्दपार करणे अवघड नाही.– सीताराम येचुरी, सरचिटणीस माकप

केंद्रात आता जे आहेत, ते पराभूत होणार आहेत. हल्ली काम कमी अन् प्रसिद्धी जास्त अशी परिस्थिती आहे.  ‘इंडिया’ आघाडीचे काम गतीने पुढे गेले पाहिजे. निवडणुका वेळेआधी लागू शकतात. आम्ही तयारीत असले पाहिजे. या बैठकीत सर्व चर्चा झाली आहे. – नितीशकुमार, बिहारचे मुख्यमंत्री

आम्ही वेगवेगळे लढल्याचा नरेंद्र मोदींना लाभ झाला. आज अल्पसंख्याक देशात सुरक्षित नाही. गरिबी वाढते आहे. अफवा पसरवून मोदी सत्तेवर आले. देशात महागाईने कळस गाठला आहे. भेंडी ६० रुपये किलो आहे, टोमॅटो इतका महाग झाला की त्याला चव राहिली नाही. मोदींनी लोकांना खोटी आश्वासने दिली.  स्वीस बँकेतला काळा पैसा प्रत्येकाला मिळणार असे स्वप्न दाखवले. चांद्रमोहिमेच्या यशस्वितेबद्दल भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन. मोदींना आता सूर्यावर पाठवायला पाहिजे. शरद पवार जुने नेते आहेत, त्यांनी आता ठाम उभे राहिले पाहिजे. – लालूप्रसाद यादव, अध्यक्ष राष्ट्रीय जनता दल

काँग्रेसला मोदी कदापि संपवू शकणार नाहीत- राहुल गांधी

मुंबई : एकेकाळच्या जगातील सर्वशक्तिशाली अशा ब्रिटिशांना भारतातून पळवून लावणाऱ्या काँग्रेसला नरेंद्र मोदी कदापिही संपवू शकणार नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी हल्ला चढविला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने दादर येथील टिळक भवन येथे राहुल गांधी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी भाजपच्या राजकारणाचा  समाचार घेतला. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबईच्या अध्यक्षा वर्षां गायकवाड आदी उपस्थित होते.

ममतादीदींचा सल्ला ; ‘नुसत्या बैठका नकोत, कामाला लागा

मुंबई : ‘नुसत्या बैठका नकोत, निवडणुकीसाठी कामाला लागा’ हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना दिलेल्या प्रेमळ सल्ल्याची चर्चा अधिक रंगली होती. संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या घोषणेची अधिवेशनावर छाप बघायला मिळाली. पत्रकार परिषद संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधला.  ग्रॅन्ड हयातच्या कर्मचाऱ्यांबरोबर त्यांच्या आग्रहास्तव पुन्हा पत्रकार परिषदेच्या ठिकाणी येऊन छायाचित्रे काढली.

संसदेच्या अधिवेशनाची छाप

विशेष अधिवेशन कशासाठी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यात ‘समान नागरी कायदा, एक देश एक निवडणुका,’ अशा विधेयकांची चर्चा केली जात आहे. त्यामुळे इंडियाच्या बैठकीतील निर्णयापेक्षा पाच दिवसांच्या अधिवेशनाची चर्चा जास्त होती. त्याचीच छाप पडली होती.

२ ऑक्टोबरला दिल्लीत घोषणा आघाडीतील नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही त्यातील काही जणांनी नंतर पत्रकारांशी संवाद साधला. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉगचे नेते जी. देवराजन यांनी बैठकीतील माहिती सांगताना आघाडीतील नेत्यांमध्ये मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी इंडिया आघाडीची सर्व रणनिती दिल्लीत स्पष्ट केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इंडियाच्या मानचिन्हात नावाप्रमाणे भारतींयांचे प्रतिबिंब उमटले पाहिजे, अशी भूमिकाही देवराजन यांनी मांडली.