आत्मनिर्भर स्वास्थ योजनेंतर्गत चार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची (एनआयव्ही) स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पादरम्यान केली. देशात सध्या पुणे शहरात एकमेव एनआयव्ही अस्तित्वात आहे.

देशात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने नवी पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेची घोषणा केली आहे. यासाठी सहा वर्षांसाठी ६४,१८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नव्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

आणखी वाचा- Budget 2021 : ६४,१८० कोटींच्या ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेची घोषणा

त्यानुसार, नवी १७ सार्वजनिक आरोग्य केंद्र उघडली जाणार आहेत. ३२ विमानतळांवरही याची निर्मिती केली जाणार आहे. त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड हेल्थची निर्मिती, ९ बायोलॅबची निर्मिती तर चार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजींची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी केली.

आणखी वाचा- Budget 2021: सीतारामन यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या वचनाचं केलं स्मरण, म्हणाल्या…

त्याचबरोबर नव्या आजारांवर लक्ष ठेवलं जाणार आहे. याद्वारे ७५ हजार ग्रामीण आरोग्य केंद्र, सर्व जिल्ह्यामध्ये चाचणी केंद्र, ६०२ जिल्ह्यांमध्ये क्रिटिकल केअर हॉस्पिटल, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र तसेच इंटिग्रेटेड आरोग्य माहिती पोर्टल अधिक सक्षम केलं जाणार आहे.