Renaming India to Bharat : जी २० शिखर परिषदेनंतर मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात काय होणार? याबाबत आतापर्यंत केवळ अंदाज बांधले जात होते. मात्र आज ज्या घडामोडी समोर आल्या आहेत, त्यामुळे संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान केंद्र सरकार देशाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आणू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. तसेच केंद्र सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडियाचे नाव बदलून भारत करण्याचा नवा प्रस्ताव मांडू शकते, अशीही माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, मोदी सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लाइव्ह मिंटने दिलेल्या माहितीनुसार, UCC आणि ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ नंतर आणखी एक अंदाज वर्तवला जात आहे, जो कलम ३६८ अंतर्गत घटनादुरुस्तीद्वारे आपल्या राष्ट्राच्या नावात ‘इंडिया’वरून ‘भारत’ असा अधिकृत बदल करण्याकडे निर्देश करतो. राष्ट्रपती भवनाने ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी २० शिखर परिषदेसाठी पाहुण्यांना जेवणासाठी आमंत्रित केले आहे. ज्यामध्ये ‘प्रेसिडंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडंट ऑफ भारत’ हा शब्द वापरण्यात आला आहे. भारताच्या राष्ट्रपतींच्या नावाने निमंत्रण पाठवल्याबद्दल काँग्रेसने मंगळवारी सरकारला फटकारले.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया ट्विटवर लिहिले की, ‘तर ही बातमी खरोखरच खरी आहे. राष्ट्रपती भवनाने ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी २० डिनरसाठी ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’च्या नावाने आमंत्रणे पाठवली आहेत. जयराम रमेश पुढे म्हणाले की, राज्यघटनेतील कलम १ नुसार, “भारत, जो इंडिया होता, तो राज्यांचा एक संघ होता.” परंतु आता या “राज्यांच्या संघराज्य”वरही आक्रमण होत आहे.
ज्या वेळी जयराम रमेश यांनी हा मोठा दावा केला, त्याचदरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या ट्विटरवर भारत गणराज्य (REPUBLIC OF BHARAT) लिहिले आणि म्हटले की, आमची सभ्यता अमृत कालच्या दिशेने जोरदार वाटचाल करीत आहे. आता या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवरून या प्रकरणाबाबत ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, ‘देशाचा सन्मान आणि अभिमानाशी संबंधित प्रत्येक विषयावर काँग्रेसचा इतका आक्षेप का आहे? भारत जोडोच्या नावाने राजकीय दौरे करणार्यांना भारत माता की जय या घोषणेचा तिरस्कार का आहे? काँग्रेसला ना देशाबद्दल आदर आहे, ना देशाच्या संविधानाचा, ना घटनात्मक संस्थांचा आदर आहे. त्यांना फक्त एका विशिष्ट कुटुंबाची स्तुती करण्याची काळजी आहे. काँग्रेसचे देशद्रोही आणि संविधानविरोधी हेतू संपूर्ण देशाला चांगलेच ठाऊक आहेत.” याआधी भाजपचे राज्यसभा खासदार हरनाथ यादव यांनी देशाचे नाव बदलून भारत ठेवावे, अशी मागणी केली होती. भारत हा आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. प्राचीन काळापासून देशाचे नाव भारत आहे, असंही ते म्हणाले होते.
केंद्रीय मंत्री काय म्हणाले?
दुसरीकडे या प्रकरणावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जयराम रमेश यांच्या दाव्यावर राजीव म्हणाले की, त्यांना प्रत्येक गोष्टीत अडचण आहे आणि मला काही बोलायचे नाही. मी एक ‘भारतीय’ आहे, माझ्या देशाचे नाव ‘भारत’ होते आणि नेहमीच ‘भारत’ राहील. काँग्रेसला ही समस्या असेल तर त्यांनी स्वत: त्यावर उपाय शोधायला हवा.
भारत हे नाव ठेवल्यास विरोधक काय करतील?
याप्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, भारताची नावे का बदलली जात आहेत? या देशात १४० कोटी देशवासी आहेत. विरोधी पक्षांनी त्यांच्या युतीचे नाव भारत ठेवले तर ते भारताचेही नाव बदलतील का?
तर, शुक्रवारी गुवाहाटी येथे एका कार्यक्रमादरम्यान लोकांना संबोधित करताना संघप्रमुख मोहन भागवत यांनी देशाला इंडिया नव्हे तर भारत म्हणावे, असे आवाहन केले होते. ते म्हणाले की, शतकानुशतके आपल्या देशाचे नाव भारत आहे, इंडिया नाही. गुवाहाटी येथे सकल जैन समाजाच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले होते की, आपल्या देशाचे नाव भारत आहे, त्यामुळे आपण जगात कुठेही गेलो तरी देशाचे नाव सर्वत्र भारतच राहिले पाहिजे, जेव्हा आपण ते म्हणू, ऐकू आणि लिहू. जरी कोणाला ते समजले नाही, तर त्याची अजिबात काळजी करू नका. समोरच्याला समजून घ्यायचे असेल तर तो स्वतःच समजून घेईल. आज जगाला आपली गरज आहे. आपण जगाशिवाय जगू शकतो, पण जग आपल्याशिवाय जगू शकत नाही, असंही त्यांनी अधोरेखित केले होते.