बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नवीन पंतप्रधानांची निवड होईपर्यंत बोरिस जॉन्सन हेच काळजीवाहू पंतप्रधान राहणार आहेत. जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत भारतीय वंशाची काही नावं आहेत. यामुळे भारतीय वंशाची व्यक्ती आगामी ब्रिटीश पंतप्रधान होऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हुजूर पक्षाचे नेतृत्व आणि पंतप्रधानपदासाठी अ‍ॅटर्नी जनरल सूएल्ला ब्रेव्हरमन, परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस, माजी परराष्ट्रमंत्री जेरेमी हंट, संरक्षणमंत्री बेन वॉलेस, उपपंतप्रधान डॉमिनिक राब, माजी अर्थमंत्री ऋषी सूनाक, नवनियुक्त अर्थमंत्री नधीम झहावी यांची नावे चर्चेत आहेत. ब्रेव्हरमन यांनी नेतृत्वपदासाठी रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्या भारतीय वंशाच्या आहेत. अनेक बड्या नावांच्या चर्चेमुळे जॉन्सन यांचे उत्तराधिकारी कोण, याबाबत उत्सुकता आहे.

“मी स्वतःला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरवत आहे, कारण मला विश्वास आहे की २०१९ च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी मी योग्य आहे. मला ब्रेक्झिटच्या संधींचा स्वीकार करायचा आहे. तसेच करकपातबाबत निर्णय घ्यायचे आहेत ” असे ब्रेव्हरमन यांनी पीटीआयला सांगितलं आहे.

दुसरीकडे, गृह सचिव प्रीती पटेल (५०) या देखील पंतप्रधान पदासाठी दावेदार मानल्या जात आहेत. त्या बोरिस जॉन्सन यांच्या निष्ठावंत म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी पदाचा राजीनामा देताना सूनाक आणि जाविद यांचं अनुसरण केलं नसले तरी त्या या पदासाठी दावेदार मानल्या जात आहेत. असं असलं तरी YouGov सर्वेक्षणात पटेल यांना फक्त ३ टक्के मतदान झाले आहे.

खरंतर, ४२ वर्षीय भारतीय वंशाच्या नेत्याने राजीनामा दिल्यानंतर बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात राजीनामा देण्याची मालिका सुरू झाली. लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले ख्रिस पिंचर यांची उपमुख्य प्रतोदपदी नियुक्ती केल्याबद्दल जॉन्सन यांनी फेब्रुवारीमध्ये माफी मागितली होती. याबाबत खुलासा समोर आल्यानंतर ऋषी सूनाक यांनी देखील त्वरित राजीनामा दिला. यानंतर आता पंतप्रधानाच्या शर्यतीत अनेक नावं असून ब्रिटीश पंतप्रधानपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

परंतु ब्रिटन देश रंग, वंश, धर्म याच्या पलीकडे जाऊन परदेशी वंशाचा नेता स्वीकारण्यास तयार आहे का? हा मूळ प्रश्न आहे. असं असलं तरी भूतकाळात ठरवलेल्या निकषांच्या पलीकडे जाऊन एक वेगळा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरण्यासाठी संबंधित खासदाराला ८ सहकाऱ्यांनी नामनिर्देशित केले पाहिजे. जर दोनपेक्षा जास्त खासदार या निवडणुकीसाठी मैदानात उतरले तर, गुप्त पद्धतीने मतदान घेतलं जाऊ शकतं.