शेजारी देशांशी संबंध हा संवेदनक्षम विषय आहे, मात्र देशाला ज्यांच्यापासून धोका आहे अशा देशांविरुद्ध भारत कमकुवत भूमिका घेणार नाही, असे नवे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भारत आणि शेजारी देश यांच्यातील संबंध हा संवेदनक्षम विषय आहे, असे ते म्हणाले.
देशाच्या संरक्षण मंत्रालयाची धुरा आपल्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही वेळ द्यावा. या मंत्रालयाची माहिती करून घेण्यासाठी काही कालावधी लागेल. भारत बळकट व्हावा यासाठी जे आवश्यक आहे ती पावले उचलण्यात येतील, असेही पर्रिकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यानंतर सोमवारी सुरेश प्रभू (रेल्वे), मनोहर पर्रिकर (संरक्षण), अरुण जेटली (माहिती-प्रसारण), जे. पी. नड्डा (आरोग्य) या मंत्र्यांनी आपल्या खात्यांचे सूत्रे हाती घेतली.
या मंत्र्यांसमवेतच डी. व्ही. सदानंद गौडा, वाय. एस. चौधरी, जयंत सिन्हा, बाबुल सुप्रियो, हर्षवर्धन, विजय सांपला, व्ही. के. सिंग आणि बंडारू दत्तात्रेय या अन्य १२ मंत्र्यांनी आपल्या खात्यांचा पदभार स्वीकारला.
शत्रूंविरुद्ध कमकुवत भूमिका घेणार नाही -पर्रिकर
शेजारी देशांशी संबंध हा संवेदनक्षम विषय आहे, मात्र देशाला ज्यांच्यापासून धोका आहे अशा देशांविरुद्ध भारत कमकुवत भूमिका घेणार नाही, असे नवे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-11-2014 at 06:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will not allow country to go defenceless against enemies manohar parrikar