आमची संघटना पाकिस्तानमधील हिंदू मंदिरांना आणि बिगर मुस्लिमांच्या पवित्र धार्मिक स्थळांना धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही जमात-उल-दवा संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याने दिली आहे. हाफीज सईद हा मुंबईवरील २६\११ हल्ल्याच्या प्रमुख सुत्रधारांपैकी एक आहे. तो काल सिंध प्रांतातील माटली येथे एका बैठकीदरम्यान बोलत होता. पाकिस्तानमधील मंदिरे आणि अन्य धर्मीयांची धार्मिक स्थळे नष्ट करण्याला आम्ही पाठिंबा देणार नाही. जमात-उल-दवा या संघटनेवर भारताच्या सीमेलगत असणाऱ्या सिंध प्रांतात मदरसे स्थापन करून कट्टरतावाद पसरविण्याचा आरोप आहे. मात्र, हे सर्व आरोप संघटनेने फेटाळून लावले आहेत. याशिवाय, सईदने काश्मीरी मुसलमानांचे पाठिंबा दिल्ल्याबद्दल आभारही मानले आहेत. पाकिस्तानातील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था प्रामाणिकपणे पाकविरोधी घटक आणि ‘रॉ’सारख्या संघटनांविरोधात लढा देत आहेत. मात्र, नवाज शरीफ सरकार याबाबत सातत्याने मौन बाळगून असल्याचा आरोपही हाफीजने या बैठकीदरम्यान केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा