यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आज रविवार सकाळी रायपूर येथे पोहोचले आणि रामकृष्ण मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या नक्षली हल्ल्यातील जखमींची भेट घेतली. “नक्षलवादासमोर देश कधीही झुकणार नाही, एकत्र येऊन नक्षलवादाचा सामना करू” असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह रायपूर येथील काँग्रेस भवनात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. तसेच “नक्षवाद देशासमोरील मोठे आव्हान आहे. या हल्ल्यातील गुन्हेगारांना कठोर शासन करण्यात येईल” असेही पंतप्रधान म्हणाले. नक्षली हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये व जखमींना पन्नास हजार रुपये मदत म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
सदर नक्षली हल्ला हा काँग्रेस पक्षावरील हल्ला नसून हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनीही रायपूर येथील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

Story img Loader