गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय तरुण सचिन मीना यांची प्रेमकहाणी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही घटना ताजी असताना आता राजस्थानातील भिवाडी येथील एक महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली आहे. संबंधित महिलेचं नाव अंजू असून ती भिवाडी जिल्ह्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करते. २१ जुलै रोजी ती भिवाडी येथून फेसबूक मित्र नसरुल्लाह याला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली आहे. आपल्या पतीला काहीही न सांगता ती गुपचूप पाकिस्तानात गेली. याबाबतची माहिती मिळताच पतीला धक्का बसला आहे.

या घटनेनंतर पाकिस्तानात गेलेल्या अंजूने ‘राजस्थान तक’शी संवाद साधला आहे. तसेच पुढील दोन-चार दिवसात मी पुन्हा भारतात येणार आहे, असं तिने सांगितलं आहे. तसेच मी पाकिस्तानात आपल्या फेसबूकवरील मित्राला भेटण्यासाठी आणि एका लग्नासाठी आले आहे. शिवाय आपण पाकिस्तानातील पेशावरजवळील एका परिसरात सुरक्षित आहोत, असंही तिने सांगितलं.

Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mamta Kulkarni on her connection with drug lord Vicky Goswami
“दुबईत तुरुंगात असताना विक्कीने मला…”, ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा; बॉलीवूड कमबॅकबद्दल म्हणाली…
Mumbai-Valsad double-decker journey will stop soon
रेल्वे प्रवाशांचे पुन्हा हाल! मुंबई- वलसाड डबलडेकरचा प्रवास लवकरच थांबणार
arjun kapoor on parents divorced
“आई वडिलांच्या घटस्फोटामुळे माझ्या अभ्यासावर…”, अर्जुन कपूर झाला व्यक्त; म्हणाला, “मी शिक्षणातून…”
Pakistani Beggars in Saudi Arabia Freepik
हाय प्रोफाईल भिकारी ठरले पाकिस्तानची डोकेदुखी, मुस्लीम राष्ट्राच्या तडाख्यानंतर विमानप्रवासावर घातली बंदी
mahira khan ranbir kapoor viral photo controversy
रणबीर कपूरबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंवर पाकिस्तानी अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मी तेव्हा रोज…”
Sunanda Pawar and Rohit Pawar
Sunanda Pawar : “माझी आई पवारांची मोठी सून…”, सुनंदा पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया!

‘राजस्थान तक’शी संवाद साधताना अंजूने सांगितलं की, मी पाकिस्तानातील पेशावर पासून काही अंतरावर असणाऱ्या दीर अपर परिसरात आहे. हा परिसर मनाली प्रमाणे डोंगराळ भाग असून मी येथे सुरक्षित आहे. मी माझ्या पतीला जयपूरला जाते, असं सांगून पाकिस्तानात आले आहे. मी येथे फिरायला आले आहे. मी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आले आहे. मी एका लग्नकार्यासाठी येथे आले आहे.

हेही वाचा- “जयपूरला जाते असं सांगितलं आणि…”, पाकिस्तानात गेलेल्या भारतीय महिलेच्या पतीचा धक्कादायक खुलासा

“पाकिस्तानात माझा एक मित्र आहे. त्याच्या कुटुंबीयांशी माझं चांगलं बोलणं होतं. आम्ही दोन वर्षांपूर्वी मित्र बनलो होतो. मी एका लग्नासाठी इथे आले आहे. पण हे ठिकाण चांगलं असल्याने मी फिरायलाही आले. सीमा हैदरशी माझी तुलना करणं योग्य नाही. मी पुन्हा भारतात येणार आहे आणि मी इथे सुरक्षित आहे. मी दोन-चार दिवसात भारतात येणार आहे. मी पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी लग्न करण्याच्या हेतूने आले नाही. लग्नाच्या सुरुवातीपासून माझं आणि माझ्या पतीचं फारसं जमत नाही. मी मजबुरी म्हणून पतीबरोबर राहत होतो. पण आता भारतात आल्यानंतर मी पतीशी विभक्त होऊन माझ्या मुलांबरोबर एकटी राहणार आहे,” असंही अंजूने सांगितलं.

Story img Loader