भाजपाच्या खासदार उमा भारती आपल्या वेगवेगळ्या भूमिका आणि विधानांमुळे चर्चेत असतात. आताही उमा भारतींनी केलेल्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा होत आहे. मध्यप्रदेशात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. त्यामुळे मद्यालयांचे गोशाळेत रुपांतर करणार, असं विधान उमा भारतींनी केलं आहे.
“भाजपाशासित मध्य प्रदेशत महिलांविरुद्ध गुन्ह्यांत वाढ झाली आहे,” असा दावा करत उमा भारती म्हणाल्या की, “भोपाळपासून ३५० किलोमीटर असलेल्या निवारी जिल्ह्यातील ओरछा येथे प्रसिद्ध राम राजा सरकार मंदिराजवळ बेकायदेशीपणे मद्यालयाचं दुकान सुरु करण्यात आलं आहे. सरकारच्या मद्य धोरणाची वाट पाहणार नाही. नियमांचे उल्लंघन करुन दुकान चालवणाऱ्या मद्यालयांचे गोशाळेत रुपांतर करण्यास सुरुवात करणार आहे.”
हेही वाचा : अध्यक्ष जो बायडेन यांचं पंतप्रधान मोदींना अमेरिका भेटीचं निमंत्रण, कधी होणार दौरा?
“प्रभू श्रीरामाच्या नावाने सरकारे बनवली जात आहेत. पण, राम राजा मंदिराजवळ मद्यालयाच्या दुकानाला परवानगी देण्यात आली आहे. या बेकायदेशीर दारुच्या दुकानाबाहेर ११ गायी बांधण्यास लोकांना सांगितलं आहे. कोण रोखण्याची हिंमत करत ते पाहू. या गायींना मद्यालयाच्या बाहेरच खाऊ घालू आणि पाण्याची व्यवस्था करु,” असं उमा भारतींनी म्हटलं.
“लोकशाहीत लोकांना चांगलं किंवा वाईट निवडण्याचा पर्याय असतो. पण, तेव्हा लोक वाईट पर्याय निवडतात. तसेच, सरकार स्थापन करणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण, एक निरोगी समाज विकसित करणे आणि महिलांचे संरक्षण, मुलांचे भविष्य सुनिश्चित करणे ही मोठी गोष्ट आहे,” असं उमा भारतींनी सांगितलं.
हेही वाचा : मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदू, शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचा दावा
मद्यालय सेवनाविरोधातील मोहिमेमुळे भाजपाचे काही लोकं ट्रोल करत असल्याचं सांगत उमा भारती म्हणाल्या, “मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपदावर मी काम केलं आहे. पंतप्रधानपद हे सर्वोच्च आहे. पण, मद्यालय विरोधी आंदोलनामुळे मला पंतप्रधान पद मिळेल का? असा भाजपाचा एक गट पसवत आहे,” असं उमा भारतींनी म्हटलं.