पीटीआय, नवी दिल्ली

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष होण्यासाठी सिद्ध झाले असताना त्यांच्या ‘अमेरिका प्रथम’ धोरणाचा भारतीय निर्यातदारांना फटका बसू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ट्रम्प सत्तेत आल्यानंतर वाहने, कापड, औषधे आदीवरील आयातशुल्कामध्ये वाढ करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

The world attention is on the policies of Donald Trump second term as president
अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातील धोरणांवर जगाचे लक्ष
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Resolution to grant special status to Jammu and Kashmir approved
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर; विधानसभेत जोरदार खडाजंगी
Thanks to voters from Donald Trump after winning the US presidential election
अमेरिकेचा सुवर्णकाळ… ट्रम्प यांच्याकडून मतदारांचे आभार
Supreme Court criticizes Uttar Pradesh government regarding bulldozer operation
‘रातोरात बुलडोझर कारवाई नकोच’; सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारले
Ramdas Athawale On US Election Results 2024 :
Ramdas Athawale : ‘डोनाल्ड ट्रम्प आणि मी ‘रिपब्लिकन’ पक्षाचेच’, रामदास आठवलेंची मिश्किल टिप्पणी!
Donald Trump won the US presidential election
अमेरिकेत पुन्हा ट्रम्प! अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड; कमला हॅरिस यांचा धक्कादायक पराभव
The Supreme Court directed the Ajit Pawar group from the clock symbols
‘घड्याळ’ न्यायप्रविष्ट असल्याचे जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला पुन्हा बजावले

भारत आणि अमेरिकेमध्ये वर्षाला साधारणत: १९० अब्ज डॉलरचा व्यापार होतो. ग्लोबल ट्रेड इनिशिएटिव्हचे संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले, की ट्रम्प हे चीननंतर भारत आणि अन्य देशांनाही वाढीव शुल्क आकारणीच्या यादीमध्ये समाविष्ट करू शकतात. ऑक्टोबर २०२०मध्ये ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख ‘टेरिफ किंग’ असा केला होता. त्यामुळे ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारताला पुन्हा वाटाघाटी कराव्या लागू शकतात, असे श्रीवास्तव म्हणाले. त्याच वेळी ट्रम्प यांनी चीनबाबत अधिक कठोर धोरण अवलंबिल्यास त्याचा भारताला फायदादेखील होऊ शकतो, असे मतही त्यांनी नोंदविले. ‘अमेरिकेला पुन्हा महान बनवूया’ (मेक अमेरिका ग्रेट अगेन) ही ट्रम्प यांची घोषणा असून त्यासाठी ते विविध वस्तू आणि सेवांवरील आयातशुल्क वाढविण्याची शक्यता असल्याचे आंतरराष्ट्रीय व्यापार अभ्यासक बिस्वजित धर म्हणाले. ट्रम्प सत्तेत येत असल्याने आपण ‘संरक्षणवादा’च्या नव्या पर्वात प्रवेश करीत आहोत, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>Supreme Court : “ही मनमानी…”, बुलडोझर कारवाईवरून योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; २५ लाखांच्या भरपाईचे आदेश

व्हिसा’ धोरणात बदल?

ट्रम्प सत्तेत आल्यानंतर ‘एच-१बी व्हिसा’च्या नियमांमध्ये काही बदल केले जाऊ शकतात आणि त्याचा फटका भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना बसू शकतो, असे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे. ट्रम्प यांची विस्थापितांबाबतची धोरण अत्यंत कडक असून त्यामुळे ते व्हिसा नियम अधिक कठोर करू शकतात, असे मत अजय श्रीवास्तव यांनी नोंदविले.

Story img Loader