केंद्र सराकरने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाचा अजेंडा अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु, समान नागरी कायदा, एक देश एक नेशनसह अनेक विधेयकांवर या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच, इंडियाचं नाव भारत करण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या विशेष अधिवेशनाला जाणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सरकारने त्यांच्या अमृतकालानिमित्त अचानक विशेष अधिवेशन बोलावलं आहे. आम्ही त्या अधिवेसशनात सहभागी व्हायचं की नाही ते बैठकीत ठरवलं जाईल. परंतु, या अधिवेशनाची गरज नव्हती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हीच भूमिका घेतली. हे अधिवेशन कशाला बोलावलं आहे? तुमच्या प्रचारासाठी? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, “मणिपूरवर चर्चा करताय का? अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसले आहे, त्यावर चर्चा करायत का? या दोन विषयावर चर्चा होणार असेल तर आम्ही पाठिंबा देऊ. पण तुमच्या प्रचारासाठी सुरू असेल तर त्यासंदर्भात आम्हाला चर्चा करावी लागेल, असं संजय राऊत म्हणाले.