बिहारमध्ये दलित-महादलितांनी धुडकावून लावल्यानंतर भारतीय जनता पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीवर्षांनिमित्त हिवाळी अधिवेशनातील दोन दिवस त्यांच्या कार्य व योगदानास समर्पित केले आहेत. २६ नोव्हेंबरपासून सुरू होणारे अधिवेशन २३ डिसेंबपर्यंत चालेल. प्रारंभीचे दोन दिवस डॉ. आंबेडकरांचे राज्यघटना निर्मितीतील योगदान, सामाजिक कार्यावर चर्चा होईल, असे केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. भाजप खासदार नाना पटोले यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्यावर चर्चा करण्यासाठी अधिवेशनातील एक दिवस देण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती, तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही मागणी पहिल्यांदा बिजू जनता दलाचे खासदार तथागत सतपथी यांनी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संसदीय कामकाज समिती (सीसीपीए)च्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला. या बैठकीनंतर नायडू म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचे विचार, कार्य व त्यांचे भारतीय राज्यघटना निर्मितीच्या योगदानावर चर्चा करण्यासाठी प्रारंभीचे दोन दिवस (दि. २६ व २७ नोव्हेंबर) निश्चित करण्यात आले आहेत. या दोन्ही दिवशी प्रश्नोत्तराचा तास होणार नाही. डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी सर्वप्रथम बीजेडीच्या तथागत सतपथी यांनी ८ मे रोजी लोकसभेत केली होती.
या अधिवेशनात वस्तु व सेवाकर विधेयक मंजूर करवून घेण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. बिहारमधील पराभवामुळे विरोधकांची एकी असल्याने हिवाळी अधिवेशन सरकारसाठी सोपे नाही.

बिहार विधानसभा निवडणूक निकालांवरून जनादेश मिळाल्याचा अर्थ लावून संसदेचे कामकाज रोखून धरू नये. कामकाज व्हायला हवे हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवले पाहिजे.
-व्यंकय्या नायडू