संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला २४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून, २३ डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीयकार्य समितीने हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आणि तारीख सोमवारी निश्चित केली. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांची एकूण २२ सत्र होणार आहेत. सध्या संसदेपुढे ६७ विधेयके प्रलंबित असून, त्यापैकी आठ लोकसभेमध्ये आणि ५९ राज्यसभेमध्ये प्रलंबित आहेत. या विधेयकांवर चर्चा होऊन ते मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील राहणार आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या चहापान कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) खासदारांना नरेंद्र मोदी आणि वैंकय्या नायडू यांनी अधिवेशनासंदर्भात मार्गदर्शन केले.

Story img Loader