नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरला सुरू होऊन ते २२ डिसेंबपर्यंत चालेल, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी दिली. अधिवेशन काळात १९ दिवसांत १५ सत्रे होतील, असे जोशी यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे सांगितले. ‘अमृतकाळात कायदेविषयक कामकाज आणि इतर मुद्दय़ांवर चर्चा होण्याची प्रतीक्षा आहे’, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>> काँग्रेसला शंभर वर्षे सत्तेपासून वंचित ठेवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मतदारांना आवाहन

maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
Congress Complete Candidate List in Marathi
Congress Candidate List: राष्ट्रीय पक्षांचा राज्यात तंटा, महाराष्ट्रात ‘इतक्या’ ठिकाणी काँग्रेस भाजपाला थेट भिडणार; वाचा पक्षाच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
maharashtra richest candidate for assembly election 2024
पायाला फ्रॅक्चर, गोल्फ कार्टवर मतदारसंघात प्रचार; महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवाराची जोरदार चर्चा!

तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरुद्ध ‘प्रश्न विचारण्यासाठी पैसा’ या आरोपांबाबत नैतिकता समितीचा अहवाल याच अधिवेशनात लोकसभेत मांडला जाणार आहे. समितीने केलेली बडतर्फीची शिफारस अमलात आणण्यापूर्वी सभागृहाला हा अहवाल मंजूर करावा लागणार आहे.

 आयपीसी, सीआरपीसी आणि एव्हिडन्स अ‍ॅक्ट यांच्याऐवजी नवे कायदे करण्याचा प्रस्ताव असलेली तीन विधेयके अधिवेशनात येण्याची शक्यता आहे. गृहविषयक स्थायी समितीने हे तिन्ही अहवाल यापूर्वीच स्वीकारले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्त्यांशी संबंधित एक विधेयक प्रलंबित आहे. ते पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आले होते. विरोधी पक्षांच्या विरोधामुळे सरकारने विशेष अधिवेशनात पाठपुरावा केला नव्हता. सीईसी व ईसी यांना मंत्रिमंडळ सचिवाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. सध्या त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचा दर्जा आहे.