सॉफ्टवेअर क्षेत्रातील देशातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी ‘विप्रो’च्या चौथ्या तिमाहीतील नफ्यात १.६ टक्क्याने घट झालीये. एकीकडे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस आणि टीसीएस या कंपन्यांच्या नफ्यात चौथ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झालेली असताना विप्रोच्या नफ्यात घट झाली आहे. दरम्यान, चार कोटींपर्यंतच्या समभागांच्या पुनर्खरेदी प्रस्तावाला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.
करांचा वाढता बोजा आणि इतर माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नात झालेली घट यामुळे कंपनीच्या निव्वळ नफ्यामध्ये चौथ्या तिमाहीत घट झाली. चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीला २२३५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. मागील आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीमध्ये हाच नफा २२७२ कोटी रुपये इतका होता. मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या उत्पन्नात यंदा वाढ झाली आहे. चालू वर्षातील जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये कंपनीला १३७४१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीला १२१७१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. कंपनीच्या उत्पन्नामध्ये १२.९ टक्के इतकी वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा