तथाकथित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याने केलेल्या बलात्काराच्या आरोप प्रकरणी एका साक्षीदाराची उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर येथे रविवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले, की अंकित गुप्ता (३५) याला तो घरी जात असताना अज्ञात इसमांनी गोळ्या घालून ठार केले.
  गुप्ता हा आसाराम बापू यांचा स्वयंपाकी होता. आसाराम बापू याला एका शाळकरी मुलीच्या लंगिक छळाच्या कारणावरून ऑगस्ट २०१३ पासून तुरुंगात टाकण्यात आले होते. आसाराम बापू हा स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आहे व त्याने त्याच्या मुलासमवेत गुजरातच्या सुरत शहरातील दोन मुलींवर लंगिक अत्याचार केले होते.
   गुप्ता याचे गुजरात पोलिसांनी २०१३ मध्ये जाबजबाब घेतले होते व त्याने आसाराम बापू याच्या विरोधात साक्ष दिली होती. आसाराम बापू याचे भारतात ४०० आश्रम आहेत. सुरत येथील बहिणींनी आसाराम व नारायण साई या आसाराम बापूच्या मुलावर लंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. या मुली १९९७ ते २००६ दरम्यान आश्रमात राहत होत्या. एका महिलेने अलिकडेच न्यायालयात धाव घेऊन तिची आधीची जबानी बदलण्याची मागणी केली होती.

Story img Loader