पीटीआय, हावेरी
हावेरी जिल्ह्यातील आंतरधर्मीय दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाला महिलेने सामूहिक बलात्काराचा आरोप केल्याने नवीन वळण मिळाले आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या मुद्दय़ावरून सिद्धरामय्या सरकारला लक्ष्य केल्याने या घटनेला राजकीय रंग आला आहे.
हावेरी जिल्ह्यातील हंगल येथे हॉटेलच्या खोलीत घुसून दाम्पत्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यातील २६ वर्षीय पीडितेने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार केल्यानंतर सात जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. या सात जणांपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.
महिलेने सुरुवातीला सहा पुरुषांचा सहभाग असल्याचा आरोप केला, परंतु नंतर त्यांचे साथीदार असलेल्या इतर संशयितांचा उल्लेख केला. पोलीस या सर्वाना सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ती म्हणाली.
हेही वाचा >>>जम्मूमधील पूंछमध्ये लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला, प्रत्युत्तरात लष्कराकडूनही गोळीबार!
कर्नाटक भाजपने शुक्रवारी या हल्ल्याबद्दल काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. राज्यामध्ये महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली असून अराजकता वाढली आहे, असा आरोप भाजपने केला. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याने गुन्हे वाढत आहेत, अशी टीका करून भाजपने काँग्रेस सरकारला ‘झोपेचे सरकार’ असे संबोधले.
कर्नाटकातील कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात आहे. हा नैतिक पोलिसिंगचा प्रश्न नाही. एक महिला दुसऱ्या व्यक्तीसोबत लॉजमध्ये जाते आणि दोन दिवसांनी बाहेर येते आणि सांगते की तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तपास पूर्ण झाल्यावर तथ्य बाहेर येईल.- जी. परमेश्वरा, गृहमंत्री
राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नैतिक पोलिसिंगबाबत दुटप्पी धोरण आहे. राज्य सरकारला गुन्हेगारांचे संरक्षण करायचे असून हे गुन्हेगार त्यांना जवळचे आहेत. सहा जणांपैकी फक्त तिघांना अटक करण्यात आली असून इतरांना सोडण्यात आले आहे. या प्रकरणात बलात्कार झालाच नाही, असे सांगून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.- बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री, भाजप नेते